`मला आमदार भरणे यांनी अडिच वर्षे पळायला लावले...आता त्यांनी थांबावे`

`मला आमदार भरणे यांनी अडिच वर्षे पळायला लावले...आता त्यांनी थांबावे`

सराटी ( ता. इंदापूर) : मी दत्तात्रेय भरणे यांचे  सन 2009 व 2014 च्या दोन निवडणुकांत काम केले. 2009 मध्ये मला राष्ट्रवादीचे तिकिट मिळाले होते. 2014 मध्ये भरणे मला आमदारकी लढविण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांनी थांबावे, अशी मागणी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केली.

आज सराटी येथे झालेल्या मेळाव्यात भरणे यांच्याविरोधात त्यांच्या स्वपक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त करत हल्ला बोल चढविला. जगदाळे यांच्या समर्थनार्थ अनेक स्थानिक नेते सरसावले.

यावेळी बोलताना जगदाळे म्हणले, ``एक नेता, एक पद हवे, पाचे वर्षे त्याचा कार्यकाळ हवा. सन 2009 मध्ये आमदारकीचे तिकीट मला मिळत होते मात्र त्यावेळी सर्वांनी भरणे यांना तिकीट देऊन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पाडण्याचा एकत्रित प्रयत्न केला. मात्र त्यावेळी भरणे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. त्यामुळे सर्वजण खचले होते. मात्र पुन्हा सर्वाना एकत्र करून एकजूट ठेवली. त्यामुळे भरणे निवडून आले. त्यावेळी सुद्धा मला भरणे यांनी आमदारकी लढवण्याचा सल्ला दिला होता. भरणे यांनी मला अडीच वर्षे पळायला लावले, तयारी करायला लावली मात्र शेवट भरणे याना तिकीट मिळाले.``

``यंदा पक्षाकडे इतर सात जण इच्छुक आहेत. त्यापैकी कुणालाही तिकीट दया. मी त्यांना निवडून आणले नाही तर जगदाळे यांची औलाद नाही. नीरा, भीमा नदी कोरडी पडली, शेटफळ हवेली तलावात पाणी नाही, उजनीतील पाणी मिळत नाही, निरा नदीवरील बंधारे खराब झाले आहेत. त्यांना स्वयंचलित दरवाजे बसवणे गरजेचे आहे. बेरोजगारांना काम नाही. त्यामुळे जनतेची भावना ओळखणारा आमदार हवा. जनतेस सन्मान देणारा तसेच जनतेसाठी घरी जावून काम करणारा अधिकारी हवा. त्यासाठी नेते अजित पवार यांच्याप्रमाणे दिलदार आमदार तालुक्यास हवा, अशी अपेक्षा जगदाळे यांनी व्यक्त केली.

मेळाव्याच्या सुरुवातीस घोगरे यांनी माजी सहकार मंत्रीहर्षवर्धन पाटील यांचा आत्मकेंद्रित विकास तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांची पांढऱ्या पोषाखातील निष्ठावान कार्यकर्ते डावलून जीनपॅन्ट मधील नवीन कार्यकर्त्यांना बळ दिले, असा आरोप करण्यात आला. जगदाळे यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब घोलप यांनीही भरणेंना विरोध करत जगदाळेंची बाजू घेतली. 

``दत्तात्रय भरणे यांनी पक्ष माध्यमातून सर्व पदे भोगली. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही लोकांना व्यवस्थित पाणी देण्याचा शब्द दिल्याने दत्तात्रय भरणे आमदार झाले. मात्र शेतीस पाणी न मिळाल्यामुळे अर्थकारण फसले. छत्रपती कारखान्यात काम करताना भरणे यांचा हस्तक्षेप होत होता. त्यांच्या काळात कारखाना विस्तारी करण न झाल्याने कारखाना व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आमदार भरणे यांना पुन्हा तिकीट नको,`` अशी स्पष्ट भूमिका घोलप यांनी मांडली. यंदा आमदारकीचे तिकीट आप्पासाहेब जगदाळे यांना तर 2024 मध्ये मात्र मला द्यावे असे म्हणत त्यांनी आपल्या आगामी उमेदवारीची घोषणा केली. त्यावर आप्पासाहेब जगदाळे त्यांनी तात्काळ होय म्हणून संमती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com