काहीही झाले तरी कॉंग्रेस स्वबळावरच लढणार आणि सरकारमध्येही पाच वर्षे राहणार

जीएसटीला विरोध करून खासदारकीचा राजीनामा देत मी भाजपातून बाहेर पडलो,
nana patole.jpg
nana patole.jpg

पुणे : काहीही झाले तरी कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्याची तयारी झाली आहे. येत्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. एका बाजूला निवडणुका झाल्या तरी राज्य सरकारमध्ये कॉंग्रेस पूर्ण पाच वर्षे राहील. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसा शब्दच दिला आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात सांगितले.(In any case, the Congress will fight on its own and stay in government for five years)

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची पक्की तयारी झाल्याचे सांगितले. मुळात स्वबळावर लढण्यात काय चूक आहे असा प्रश्‍न त्यांनी केला. पटोले म्हणाले, ‘‘ देशाला आता कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही. केंद्रातील भाजपा सरकार पाकिस्तान धार्जिणे आहे. यांनी पाकिस्तानला फुकट लस वाटली. मास्क पाठवले. इतर देशात लॉकडाऊन संपून सर्व काही सुरळित झाले. मात्र. आपल्या देशात ते होत नाही. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. कॉंग्रेसने देश उभा केला होता. मात्र, केवळ सात वर्षात मोदी यांनी देश रसातळाला नेण्याचे काम केले आहे. देशाला या पुढच्या काळात राहूल गांधी यांच्याशिवाय पर्याय नाही. राहूल यांचे नेतृत्व दूरदृष्टीचे आहे.’’

जीएसटीला विरोध करून खासदारकीचा राजीनामा देत मी भाजपातून बाहेर पडलो, असे सांगत पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘ लोकांशी खोटे बोलून पंतप्रधान मोदी सत्तेवर आले आहेत. नोटाबंदी, जीएसटी या माध्यमातून त्यांनी देशाची वाट लावली आहे. मोदी हे देशाचे असे पंतप्रधान आहेत. ज्यांनी इथे बसून अमेरिकन निवडणुकीत ट्रम्पचा प्रचार केला.काळे धन भारतात आणण्याची भाषा केली. पंधरा लाखांची आशा दाखवली. मात्र, यातील काहीच लोकांच्या पदरात पडलेलं नाही. खोट्या प्रचाराच्या आधारे राहूल गांधी यांची टिंगळ-टवाळी व बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपावाले करीत असले तरी राहूल हेच या देशाचे भविष्य आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.’’

पंतप्रधान मोदी यांनी केवळ सात वर्षात देश विकालयला काढला आहे. अनेक खोट्या गोष्ट सांगून त्यांना देशाची आणि इथल्या जनतेची फसवणूक केली आहे. असे पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या भाजपावरही पटोले यांनी टीका केली. राज्यातल्या भाजपा नेत्यांचे महाराष्ट्रापेक्षा गुजरातवर अधिक प्रेम आहे, असे ते म्हणाले

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com