वाबळेवाडीच्या संतप्त रणरगिणींची झेडपीवर धडक : शाळेबाबत निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

वाबळेवाडी शाळेची चौकशी करूनही अहवाल सादर न केल्याने ग्रामस्थ संतप्त
वाबळेवाडीच्या संतप्त रणरगिणींची झेडपीवर धडक : शाळेबाबत निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
Pune ZPSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : गावातील यात्रा सलग आठ वर्षे रद्द करून वाबळेवाडीच्या (ता. शिरूर) नागरिकांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय करुन दाखवली. मात्र, वाबळेवाडी शाळेबाबत आलेल्या तक्रारींची प्रशासनाकडून चौकशीही करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करत नसल्याने संतप्त झालेल्या वाबळेवाडीतील सव्वाशे महिलांसह २५० नागरिकांनी आज (ता. ८ आक्टोबर) अचानकपणे थेट शिक्षण आयुक्तांसह जिल्हा परिषद गाठली आणि आत्मदहनाच्या इशाऱ्यासह २० तारखेपासून वाबळेवाडीत बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला. (Angry women from Wablewadi march on ZP)

दरम्यान, वाबळेवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळेंसह शेकडो महिलांचा संताप पाहून जिल्हा परिषदेच्या सुरक्षा विभागाला अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना आपले कार्यालय सोडून जिल्हा परिषदेच्या दारात यावे लागले.

Pune ZP
जिल्हा परिषदेतील पराभवानंतर पालघर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा म्हणून ओळख असलेल्या वाबळेवाडी शाळेबाबत जुलैपासून तक्रारी येत होत्या. माध्यमांतील काही बातम्यांच्या आधारे प्रशासनाने चौकशीची प्रक्रियाही राबविली. शाळेचे सर्व दफ्तर मागावून घेत त्याची तपासणी करून अहवाल तयार केल्याचे गेली महिनाभरापासून सांगण्यात येत आहे. काही पुढारी कारवाईचा आग्रह धरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज वाबळेवाडीकरांचा संताप अनावर झाला. एक बस, २५ चारचाकी गाड्यांमधून सव्वाशे महिला आणि सुमारे १०० युवक व पालक यांनी थेट शिक्षण आयुक्त कार्यालय गाठले. आयुक्त जागेवर नसल्याने त्यांच्या कार्यालयाकडे आंदोलनाचे निवेदन दिले. भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

Pune ZP
शिवेंद्रसिंहराजेंसह पॅनेल कराल तर, तो शरद पवारांचा अवमान

हा संपूर्ण ताफा थेट जिल्हा परिषदेत पोचला. येथील सीईओ कार्यालयात नसल्याने काही मोजक्या महिलांनी आपला मोर्चा थेट जिल्हा शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांच्या कार्यालयाकडे वळविला. प्रचंड संतापलेल्या महिलांनी गेल्या आठ वर्षांतील ग्रामस्थांचे शाळेसाठीचे योगदान, सहन केलेला त्रास आणि शाळेचा जगभरातील लौकीक याबाबत सांगितले. गौड यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत त्यांना महिलांनी निरुत्तर केले. या महिलांमध्ये वाबळेवाडीतील भारती वाबळे, निर्मला वाबळे, सुनिता वाबळे, प्राजक्ता वाबळे, शकुंतला वाबळे, योगिता वाबळे, सारिका वाबळे, स्वाती शिंदे, छाया वाबळे, श्वेता वाबळे, स्वप्नाली वाबळे, प्रज्वला वाबळे, अश्विनी वाबळे तसेच मोठ्या संख्येने प्रत्येक घरातील एक पुरुष पालक या वेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.