...आणि आमदार सुनील कांबळेंचा फोन झाला ‘स्विच ऑफ’

शिवीगाळ करणारी ध्ननिफित सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर आमदार कांबळे यांच्यावर टिकेचा भडिमार सुरू झाला आहे.
MLA Sunil Kamble
MLA Sunil KambleSarkarnama

पुणे : महापालिकेतील महिला अभियंत्याला शिवीगाळ केल्यानंतर सोशल मिडीयावर होऊ लागलेल्या टिकेमुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी आपला मोबाईल फोन बंद ठेवला आहे.

नेमका प्रकार काय झाला हे समजून घेण्यासाठी आमदार कांबळे यांना अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागला.दरम्यान, महिला आधिकाऱ्याला शिवीगाळ करणारी ध्ननिफित सोशल मिडीयावर व्हायरला झाल्यानंतर आमदार कांबळे यांच्यावर टिकेचा भडिमार सुरू झाला आहे. त्यामुळे कांबळे यांनी फोन बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

MLA Sunil Kamble
सुनील कांबळे यांचा धार्मिक रविवार

दरम्यान, आमदार कांबळे यांच्या वर्तनाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला असून दुपारी आमदार कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर शहर राष्ट्रवादी कॉंग्रसेच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.

महिला अभियंत्याला शिवीगाळ करून आमदार कांबळे यांनी नालायकणाच्या आणि बेशरमेच्या साऱ्या खुना ओलांडल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे. त्यांनी आमदार कांबळे यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.या प्रकरणातआमदार कांबळे यांनी संबंधित महिला अभियंत्यांची तसेच समस्त महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

MLA Sunil Kamble
भाजप आमदार सुनील कांबळेंची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

चाकरणकर म्हणाल्या, ‘‘ आमदार कांबळे हे भाजपा व संघाच्या संस्कारातून आले आहेत. संघ-भाजपाच्या चिखलात आमदार कांबळे यांच्यासारखी भाषा वापरणारी कमळेच उगवणार कारण त्यांची संस्कृतीच तशी आहे.ज्यांना शिवीगाळ करण्यात आली त्या महिला आधिकाऱ्यांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस त्या महिला अभियंत्यांसोबत आहे.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com