अन् अजित पवारांनी 'त्या' मुलीसमोर हात जोडले...

Ajit Pawar|Pune| अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात गोधन २०२२- देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचं उद्घाटन करण्यात आले.
Ajit Pawar latest news
Ajit Pawar latest news sarkarnama

Ajit Pawar in Agriculture College news

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या हस्ते आज पुण्यात (Pune) गोधन २०२२- देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचं उद्घाटन करण्यात आले. अजित पवार यांनी देशी गोवंश पशू प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी झालेल्या एका प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

त्याचं काय झालं, अजित पवार विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनातील वस्तू, पदार्थांची माहिती घेत होते. या वस्तू, पदार्थांची किंमत किती? त्याची निर्मिती कशी केली? तूपाची क्वालिटी कशी असते? या संदर्भात त्यांनी माहिती घेतली. त्याचवेळी त्यांनी तिथे असलेल्या एका विद्यार्थीनीला विचारले, तुम्ही राहता कुठे? यावर विद्यार्थीनीने टेंभूर्नी, सोलापूर इथे राहत असल्याचं सांगितलं. त्यावर तुम्हाला मेरिटवर अॅडमिशन मिळालंय का? किती टक्के मिळाले, असाही प्रश्न त्यांनी विद्यार्थीनीला विचारला. त्यावर विद्यार्थीनीने हो, मेरिटवर मिळालं, 99.10 % असं उत्तर दिलं. विद्यार्थीनीचे हे ऐकताच अजित पवार यांनी हसत हसतच हात जोडले आणि म्हटलं, 99 टक्के. हे पाहताच तिथे उपस्थित असलेल्यामध्ये एकच हशा पिकला.

Ajit Pawar latest news
मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करावं लागणार! लोकसभा सचिवालयाची नोटीस

इथल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहून डोळेच पांढरे झाले, आमचे दोन वर्षांचे मिळूनही एवढे मार्क झाले नसते. पण कौतुक आहे तुमचं, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या विद्यार्थीनीच कौतुकही केलं.

दरम्यान, याच प्रदर्शनात सोलापूरहून आलेल्या डेअरी कामगार महिलांशीही त्यांनी संवाद साधला. कामात मिळालेल्या वेतनाबद्दल अजित पवारांनी चौकशी केली. विशेष म्हणजे महिला कामगारांनी हातावर काढलेल्या मेहेंदीचेही अजित पवारांनी तोंडभर कौतुक केले. कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण प्रदर्शनातील प्रत्येक गोष्टीची अजित पवारांनी पाहणी केली. कृषी महाविद्यालयाच्या आवारात 27 मे ते 29 मे दरम्यान हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com