Amit Shah News : अमित शाहंच्या ताफ्यात अज्ञात व्यक्तीचा शिरण्याचा प्रयत्न; पोलिसांनी हेरलं अन्...

Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर आहेत
 Amit Shah
Amit ShahSarkarnama

Pune BJP News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मात्र, एका व्यक्तीने त्यांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या जवळचा असल्याचे सांगून अमित शाह यांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीने केला. त्यानंतर त्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

 Amit Shah
Shivsena : पक्ष मिळाला, आता शिवसेना प्रमुख पदाचं काय? शिंदे गटाची होणार कार्यकारिणी

एका हॉटेलमधून याला ताब्यात घेण्यात आलं असून सोमेश धुमाळ असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. तसेच गंभीर बाब म्हणजे या व्यक्तीला 'आयबी'च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले. यावेळी सोमेश धुमाळने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्या जवळचे असल्याचे सांगून ताफ्यात गेल्याचे सांगितले.

 Amit Shah
Sahakar Parishad : ''महाराष्ट्रातील साखर उद्योग शाहंच्या निर्णयामुळे ताठ मानेनं उभा''

स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ मात्र शाह यांच्यासोबत असलेल्या पोलीस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही. त्याचा माग काढत अखेर स्थानिक पोलिसांनी त्याला गाठले. पोलिसांनी सोमेशला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.

 Amit Shah
MAHA CONCLAVE : सहकार विद्यापीठ स्थापन करणार : अमित शहा

दरम्यान, ही व्यक्ती कोण आहे? ती कोणाच्या वाहनांत बसली? याचा शोध पोलीस घेत असून चतुर्श्रुंगी पोलीस सोमेशला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. तसेच पुढील चौकशी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com