Pune news|सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

Pune Crime| मुंबईतून पुण्याला बदली करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेतले होते
Pune Crime|
Pune Crime|

पुणे : सावकाराने पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे पुण्यात सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. गणेश शंकर शिंदे (वय 52) असे आत्महत्या केलेल्या लेखाधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या पत्नीने संबंधित सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश शिंदे यांनी मुंबईतून पुण्याला बदली करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेतले होते. 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये इतके कर्ज शिंदेंनी घेतले होते. पण सावकाराने सातत्याने व्याजाच्या पैशासाठी शिंदेंकडे तगादा लावला होता. इतकेच नव्हे तर संबंधित सावकाराने शिंदे यांना पर्सनल लोन काढून देऊ असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसेही घेतले. पण ऐनवेळी त्यांना लोन काढण्यास नकार दिला.

Pune Crime|
'टोमणे मेळावा'साठी परवानगी देऊन टाकावी; मनसेने पुन्हा शिवसेनेला डिवचले

सावकाराकडून होणाऱ्या मानसिक छळाला शिंदे कंटाळले होते. या सर्व गोष्टींचा ताण आल्यामुळे गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विजय सोनी, क्षीरसागर, साळुंखे आणि हाजरा यांना अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com