देवेंद्र अकेला नही है, ना कभी था, उनके साथ पुरी कायनात है ; अमृता फडणवीसांचा टोला

आजचा विजय शिवसेनेला धडा नाही, पण इथून पुढे आता शिवसेनेला धडे सुरु होतील.
देवेंद्र अकेला नही है, ना कभी था, उनके साथ पुरी कायनात है ; अमृता फडणवीसांचा टोला
Amruta Fadnavis, CM Uddhav ThackeraySarkarnama

पुणे :राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या (rajya sabha election result 2022) निकालावर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर (State Government) टीकास्त्र डागले आहे.

अमृता फडणवीस या नेहमीच ठाकरे सरकारवर निशाणा साधत असतात. त्या पुण्यात एका कार्यंक्रमासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

अमृता फडणवीस म्हणाल्या, "सर्व अपक्ष आमदारांना धन्यवाद. सुंदर विजय झालेला आहे, हा विजय सत्येचा आहे. सत्याच्या बाजूने सगळे आहेत, याचा मला आनंद आहे. आजचा विजय शिवसेनेला धडा नाही, पण इथून पुढे आता शिवसेनेला धडे सुरु होतील,"

"टोमणे बाजी नव्हे तर विकासाचे राजकारण आता पुढे येईल, भाजप सगळ्या गोष्टी कर्तुत्वावर मिळवते. हे कर्तुत्वाचं अन् नेतृत्वाचं यश आहे. रडीचा डाव खेळण्यासाठी भाजप हा महाविकास आघाडी नव्हे. देवेंद्र अकेला नही है, ना कभी था, उनके साथ पुरी कायनात है” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Amruta Fadnavis, CM Uddhav Thackeray
rajya sabha result : दोन आमदारांच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे एक मत बाद

महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम कोण आहे हे शिवसेनेने सिद्ध केले आहे, असा टोला देशपांडे यांनी लगावला. संदीप देशपांडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले.

"भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन, टीमवर्क आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वायफळ बडबड करून अपक्षांचा केलेला अपमान यामुळे भारतीय जनता पक्षाला राज्यसभेत यश मिळाले," असा टोला भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला आहे.

Amruta Fadnavis, CM Uddhav Thackeray
आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोमणा

भाजपने (bjp) घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे (shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत बाद ठरवण्यात आले. यावरुन राजकारण तापलं आहे. सुहास कांदे यांचे मत नेमकं बाद तरी कसे झाले, त्यांचे मत बाद होण्यामागे महत्वाची भूमिका कोणी बजावली याबाबत सध्या समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात भाजपच्या दोन आमदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. भाजपचे आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे कांदेचं मत बाद झालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in