Amol Kolhe On Sharad Pawar Retirement :
Amol Kolhe On Sharad Pawar Retirement :Sarkarnama

Amol Kolhe On Sharad Pawar Retirement : 'अध्यक्षपद सोडण्यामागील शरद पवारांच्या भावनाही समजून घेणे महत्वाचे!'

Sharad Pawar News : गेले सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत गेले सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत आहे.

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पदावरून पायउतार होण्याची घोषणा परवा (ता.२) मुंबईत करताच त्याचे पडसाद राज्यातच नाही, तर देशभर उमटत आहेत. पक्षात, तर त्यांच्या या निर्णयाने भुकंपच झाला आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून मागणी होत असून, त्याकरिता राजीनामासत्र पदाधिकाऱ्यांनी सुरु केले आहे.

Amol Kolhe On Sharad Pawar Retirement :
Hasan Mushrif Sons Got Relief : हसन मुश्रीफांच्या मुलांना १ जूनपर्यंत दिलासा; कोर्टात काय झालं?

दरम्यान, पवारांच्या या निर्णयावर आघाडीसह युतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यावर नेमकी व संयमी प्रतिक्रिया गुरुवारी (ता.४) पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. पदावरून पायउतार होण्यामागील शरद पवारांच्या भावनाही समजून घेणं महत्वाचं आहे. गेले सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत असल्याने ते विचाराअंती याबाबतीत नेमका निर्णय़ घेतील, असे ते म्हणाले.

पक्षात, वरिष्ठ नेत्यांत तसेच मतदारसंघात आपला संवाद कमी पडत चालला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी खोडून काढला. नेता आणि अभिनेता या दोन भूमिका करताना तारेवरची मोठी कसरत होत आहे. मात्र, या दोन्ही भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.

Amol Kolhe On Sharad Pawar Retirement :
Pune Builder : पुण्यातील तीन बड्या बिल्डरांवर इन्कम टॅक्सची धाड, शहरात दिवसभर एकच चर्चा !

डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित "शिवपुत्र संभाजी" या महानाट्याच्या या सिझनची सांगता पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी कोल्हे हे पिंपरीत आले होते. या महानाट्यादरम्यान कराडला त्यांना १ मे रोजी दुखापत झाली होती. तरीही त्यांनी तो प्रयोग पूर्ण केला होता. त्यानंतर उपचार घेत ते ११ मे पासून पिंपरीत सहा प्रयोग करणार आहेत.

आतापर्यंत २३५ प्रयोग झाले असून दिवाळीनंतर विदर्भात आणि परराज्यात ते होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या गाजलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अनेक कलाकार या नाट्यातही आहेत. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी नक्की हे महानाट्य पाहावे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in