हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंचा नादखुळा डान्स: 'तो' व्हिडीओ व्हायरल

Amol Kolhe| अमोल कोल्हे आपल्या हटके स्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असतात.
Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama

जुन्नर : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात. राजकीय सभा, बैठकांशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वी मावळमध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीतील व्हिडीओ समोर आला होता त्यात ते बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून शर्यतीत सहभागी झाले होते. त्यानंतर आता त्यांचा असाच एक धम्माल व्हिडीओ समोर आला आहे. यात ते एका लग्नाच्या वरातीत डान्स करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल कोल्हे यांचे खासगी पीए तेजस झोडगे यांचे नारायण गाव येथे लग्न होते. या लग्नात त्यांनी नवरदेवासोबत मिरवणूकीत ताशा, हलगी आणि पिपाणीच्या तालावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. अमोल कोल्हेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांच्याही लाईक्स आणि कमेट्स येत आहेत.

Amol Kolhe
आमचा राजकीय दैारा नाही ; अयोध्या दैाऱ्यावरुन राऊतांचा राज ठाकरेंना टोमणा

दरम्यान, अमोल कोल्हे आपल्या हटके स्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर स्वत: जीममधील वर्कआऊटचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत होते. ''टायर तो फायर निकला…लेकिन मैं थकेगा नहीं साला…लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल,'' असे कॅप्शनही त्यांनी या व्हिडीओला दिले होते.

काही दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे बैलगाडा घाटात घोडीवर बसले होते. त्यावेळी ते चर्चेत आले होते. त्यानंतर आज या लग्नात त्यांनी जो ठेका धरला तो चांगलाच चर्चेत आला आहे. मावळ येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत कोल्हेंनी चक्क घोड्यावरून एंट्री मारली. त्या एंट्रीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. माजी खासदार आढाळराव पाटील यांनी त्यांना आव्हान दिले होते. ते आव्हान स्विकारच अमोल कोल्हेंनी निमगाव दावडी येथे बैलगाडा शर्यतीत शर्यतीत रुबाबदार एन्ट्री केली. या नंतर कोल्हेंनी घोडीवर मांड टाकत घोडीवरुन बारी मारली. आपली घोडेस्वारीचे कौशल्य दाखवत दोन्ही हात सोडून यावेळी अमोल कोल्हेंनी बारी मारली. हा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com