अमोल कोल्हे म्हणाले, `या दोन 'पाहुण्यांना' आजवर घराबाहेरच ताटकळत ठेवलयं!`

डॉ अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की, 14 वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही. पण 14 वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol KolheSarkarnama

पुणे : शिरूर लोकसभा मददारसंघाचे राष्ट्रवादीचे (NCP) खासदार व अभिनेते डॉ अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांच्या लग्नाला आज (ता.6 डिसेंबर) 14 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या पत्नीला हटके अंदाजात फेसवुक पोस्ट करत करत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावर सोशल मीडियावर शुभेच्छा व प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत.

Dr. Amol Kolhe
छगन भुजबळांची प्रतिज्ञा; एक थेंब पाणीही गुजरातला देऊ देणार नाही!

डॉ अमोल कोल्हे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की, 14 वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही. पण 14 वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ताटकळत ठेवले आहेत.

पहिला पाहुणा "तू चूक" आणि दुसरा "मीच बरोबर"... कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो, असे कोल्हे यांनी म्हटले आहे. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, अश्या हटके अंदाजात डॉ कोल्हेंनी त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या.

Dr. Amol Kolhe
पोंक्षेनी एकाला डॅंबिस म्हटले... पण लगेच ते डिलीट केले...

डॅा. कोल्हे हे अभिनेते म्हणून चांगलेच लोकप्रिय आहेत. मात्र, ते सद्ध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मागील महिन्यात त्यांनी त्यांच्या एकांतवासाबद्दल एक पोस्ट लिहली होती. त्यावर चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी याबाबत खुलासा करत व्हिडीओच्या मार्फत स्पष्टीकरण दिले होते. खासदार कोल्हेंच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे या देखील डॉक्टर असून त्या 2009 पासून मुंबईतील केईएम रुग्णालयात डॅाक्टर म्हणून काम करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com