आमदार महेश लांडगेंचा डाव अमोल कोल्हेंनी त्यांच्यावरच उलटवला!

आमदार महेश लांडगे यांच्या विमानतळाबाबतच्या आवाहनाला अमोल कोल्हेंनी दिला असा प्रतिसाद
Amol Kolhe-Mahesh Landge
Amol Kolhe-Mahesh LandgeSarkarnama

मंचर (जि. पुणे) : खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, यासाठी सहकार्य करुच. पण, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भूसंपादन होत नसल्याने रखडलेल्या नाशिक फाटा ते मोशी रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांना त्यांच्या मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाची करून दिलेली जाणीव म्हणजे ‘नहले पे दहेला' असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Amol Kolhe responds to MLA Mahesh Landge's call for an airport)

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरमधील नवीन जागेला संरक्षण विभागाने रेड सिग्नल दिला आहे. त्यानंतर हे विमानतळ खेड तालुक्यातच व्हावे, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबतचे पत्र आमदार लांडगे यांनी डॉ. कोल्हे यांना पाठवून राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. लांडगे यांचे हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होताच त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

Amol Kolhe-Mahesh Landge
जयंत पाटलांना त्या स्वागताचे अप्रूप! : पोस्ट लिहित म्हणाले...

त्या पार्श्वभूमीवर राजकीय जोडे बाजूला ठेवून विमानतळाबाबतच्या सहकार्याच्या आवाहनाचे स्वागत करतानाच स्वतःच्या भोसरी मतदारसंघातील नाशिक फाटा ते मोशी रस्ता केवळ पिंपरी महापालिकेकडून भूसंपादन प्रक्रिया होत नसल्याने रखडल्याकडे आज डॉ. कोल्हे यांनी लांडगे यांचे लक्ष वेधले आहे. महापालिकेत आपल्या पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे या कामासाठी लांडगे यांनाच त्यांनी सहकार्याचे आवाहन करीत त्यांच्यावरच डाव उलटवला असल्याची चर्चा रंगली आहे.

Amol Kolhe-Mahesh Landge
स्वतःच्या सावलीलाही भिणारे म्हणतात ‘सुनील तटकरे थापेबाज’ : रविशेठ पाटलांना टोला

वास्तविक चाकण एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये काम करणारा नोकरदार वर्ग प्रामुख्याने भोसरी, पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्य करतो. या कर्मचाऱ्यांना रोजच वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. या कामगारांसाठी विमानतळाप्रमाणेच रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अधिक जिव्हाळ्याचा आहे. येथील कामगारांना दैनंदिन विमानप्रवास करावा लागत नाही. मात्र पाच-सहा वर्षांपासून नाशिक फाटा ते मोशी रस्त्याच्या भूसंपादनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नाची जाणीव या निमित्ताने डॉ. कोल्हे यांनी करून दिली आहे, अशा चर्चा खेड व भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरु झाली आहे. मात्र, गेली दहा वर्ष जागेसाठी घिरट्या घालत असलेल्या विमानतळाच्या जागेच्या प्रश्नाला आता तरी गती मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in