ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरी दुमदुमला; शिवजयंतीसाठी अमित ठाकरे गडावर दाखल

Shivjayanti| MNS | Amit Thackeray| राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती (Shivjayanti) साजरी केली जात आहे.
Amit Thackeray visit Shivneri Fort, Shivjayanti News, MNS News, Amit Thackeray News
Amit Thackeray visit Shivneri Fort, Shivjayanti News, MNS News, Amit Thackeray News

पुणे : राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती (Shivjayanti) साजरी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) शिवनेरीवर (Shivneri) गडावर दाखल झाले आहेत.मनसेच्या वतीने आज (२१ मार्च) शिवनेरीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ च्या सुमारासच अमित ठाकरे हे शिवनेरीवर दाखल झाले. (Shivjayanti latest news update)

सकाळपासूनच गड ढोल ताशा आणि शिवगर्जनांनी दुमदुमन गेल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज्यभरातून शिवप्रेमीही सकाळपासून दाखल होऊ लागले आहेत. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाकडून गडावर पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. सकाळीच अमित ठाकरे यांच्या हस्ते गडावरील शिवाई देवीची पूजा करण्यात आली. यावेळी शेकडो मनसैनिक आणि शिवप्रेमी गडावर हजर होते. (Amit Thackeray visit Shivneri Fort)

Amit Thackeray visit Shivneri Fort, Shivjayanti News, MNS News, Amit Thackeray News
उद्या एमआयएम खरंच शिवसेनेसोबत आली, तर आश्‍चर्य वाटायला नको…

राज ठाकरेंनी सांगितले तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे कारण?

दरम्यान, गेल्या महिन्यात १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसे तिथीनुसार शिवजयंती का साजरी करतो, याचे कारण सांगितले होते. चांदिवली येथे शिवजयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याचे कारण सांगितले.

आमच्या छत्रपतींचा जयजयकार, आमच्या छत्रपतींची जयंती ३६५ दिवस आपण साजरी करावी मला असं वाटतं. पण तारखेनुसार आज साजरी केली तरी काही हरकत नाही आणि तिथीनेही साजरी केली तरी काही हरकत नाही. पण तिथीने साजरी का करतो? कारण, आपल्याकडे जेवेढे सण येतात दिवाळी, गणेशोत्सव हे सर्व सण आपण तिथीने साजरे करतो. आपण तारखेने साजरे नाही करत. मागील वर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती, ती या वर्षी त्याच तारखेला असते का? नसतेच ना, असंही राज ठाकरे यांनी नमुद केलं.

गेल्या वर्षी गणेशोत्सव ज्या तारखेला होता तो या वर्षीही त्याच तारखेला असेल का, कारण ते सणही तिथीनुसार येतात, जन्मदिवस, वाढदिवस हे आपले. महापुरुषांचा आणि तोही छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी सणच, आणि म्हणून तो सण आपण तो तिथीने साजरा करायचा. पण याचा अर्थ आज साजरा करायचा नाही, असंही नाही. त्यामुळे ज्या दिवशी तिथीने साजरा करायचा त्यावेळी यापेक्षाही मोठ्या जल्लोषात तुमच्याकडून शिवजयंती साजरी झाली पाहिजे. एवढच सांगायला मी आज इथे आलो आहे.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com