Amit Shah pune tour

Amit Shah pune tour

Sarkarnama 

अमित शहांसाठी शहराध्यक्ष मुळीकांच्या घरी भोजनाचा फक्कड बेत

अमित शहा यांच्या दौऱ्याचे निमित्ताने पुण्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपने शक्तप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीचा प्रारंभ भाजप करणार आहे. दुसरीकडे अमित शहांनी वैयक्तिक भेटी देत शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Amit Shah pune tour</p></div>
अमित शहांचा पुण्यातील मुक्काम कोठे? अजितदादा म्हणाले, ``माझ्या सूटमध्ये चालेल...``

शहा यांचा रविवारी (ता. 19 डिसेंबर) भरगच्च कार्यक्रम आहे. ते सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, त्यानंतर चाकण येथील एनडीआरएफचा कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या कार्यक्रम झाल्यानंतर पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळण्याच्या लोकर्पण शहा यांच्या हस्ते होणार आहे. भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला असून, त्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शहा पर्वती पायथा येथील घरी जाणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Amit Shah pune tour</p></div>
अजितदादा सरकारी विमानाने जयपूरला गेले.. एकनाथ शिंदे, आदित्य वाट पाहत बसले

शहराध्यक्ष मुळीक यांच्या घरी जेवण

शासकीय व राजकीय कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी साडे सातच्या सुमारास अमित शहा हे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी येथील घरी जेवणासाठी जाणार आहेत. पक्षाचे काही नगरेसवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमित शहा घरी येणार असल्याने मुळीक कुटुंबियांनी जय्यैत तयारी सुरू केली आहे. यावेळी मराठमोळ्या पद्धतीचे जेवण असणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com