Amit Shah News : अमित शाहंनी टिळक कुटुंबीयांची भेट घेत केलं सांत्वन

Pune News : अमित शाह यांनी आपुलकीने टिळक कुटुंबियांची चौकशी केली
Amit Shah News
Amit Shah NewsSarkarnama

Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे.

तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. याबरोबरच त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. याबरोबरच आज संध्याकाळी जे डब्ल्यू मॅरीयेट हॉटेलमध्ये अमित शाह यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली.

Amit Shah News
Thackeray vs Shinde : ठाकरे - शिंदे गटांनी आपल्या सोशल मीडियाच्या नावामध्ये केला मोठा बदल

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अमित शाह यांची ही सांत्वनपर भेट होती. अमित शाह हे टिळकांच्या घरी जाऊन टिळक कुटुंबियांची भेट घेणार होते. मात्र, वेळेअभावी ते घरी जाऊ शकले नाहीत.

मात्र, त्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांना जे डब्ल्यू मॅरीयेट हॉटेलमध्ये बोलावून घेत आपुलकीने टिळक कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्याबाबतही काही विचारपूस करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Amit Shah News
बच्चू कडू म्हणाले, महापुरुषांच्या विचारांना बांधून ठेवता येत नाही...

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून नेत्यांच्या सभा, भेटीगाठी, बैठका यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच अमित शाह हे देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी आज मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Amit Shah News
Election Commission News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देईल? कायदेतज्ज्ञ म्हणतात...

तसेच ते पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचीही भेट घेणार असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा किती फायदा भाजपला होईल हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com