खासदार बापटांशी बोलण्यासाठी अमित शहांनी चंद्रकांतदादांचे डोके खाल्ले..

अमित शहा (Amit Shah) यांच्या विविध कार्यक्रमांत गिरीश बापट यांची अनुपस्थिती चर्चेची ठऱली होती.
Amit Shah- Chandrakant Patil

Amit Shah- Chandrakant Patil

Sarkarnama

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे आज पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. पुणे महापालिकेतही (PMC) ते येऊन गेले. पण पुण्याचे खासदार असलेले गिरीश बापट (Girish Bapat) यांच्याशी त्यांचा संपर्क नव्हता. कोणत्याही परिस्थितीत मला गिरीश बापटांशी बोलायचे आहे, असे आग्रह त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे धरला. पाटील यांनी खुद्द पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बापट यांच्याकडे पाठवून शहांशी त्यांचे बोलणे करून दिले. हा किस्सा खुद्द चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत सांगितला.

Amit Shah- Chandrakant Patil

अमित शहा यांची दगडूशेठ चरणी प्रार्थना;पाहा व्हिडिओ

शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील भाजपच्या बूथ संपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्या आधी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते झाले. त्या आधी तीन कार्यक्रमांत शहा यांनी हजेरी लावली होती. या संपूर्ण कार्य़क्रमांत बापट गैरहजर होते. बापट हे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर नाराज तर नाही ना, अशी चर्चा अधूनमधून सुरू असते. या नाराजीमुळे तर बापट हे शहा यांच्या कार्यक्रमांना अनुपस्थित आहेत का, अशी शंका काहींनी आली.

Amit Shah- Chandrakant Patil

मी मूक प्रेक्षक बनून स्वस्थ बसणार नाही : अमित शहांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

शहा हे कार्यकर्त्यांची काळजी कसे घेतात, हे सांगताना चंद्रकांतदादांनी शहा यांनाही बापट यांची अनुपस्थिती लक्षात आल्याचे सांगितले. त्यांनी बापट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मला कोणत्याही परिस्थितीत बापटांशी बोलायचे असल्याचे सांगत त्यासाठी चंद्रकांतदादांना सतत आग्रह धरला. पण बापट हे मोबाईल दूरध्वनी घेत नव्हते. शेवटी चंद्रकांतदादांनी शहर सरचिटणीस राजेश पांडे यांना सांगितले आणि पुढच्या पाच मिनिटांत बापटांकडे जाऊन या, असा आदेशच दिला. काही कालावधीतच बापट यांच्याशी शहांशी बोलणे झाले. तेव्हाच शहा यांना हायसे वाटले. त्यानंतर बापट हे गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या मेळाव्याला उपस्थिती लावली आणि तेथे भाषणही केले.

Amit Shah- Chandrakant Patil

अमित शहांसाठी शहराध्यक्ष मुळीकांच्या घरी भोजनाचा फक्कड बेत

बापट हे आजारी असल्याने फोन उचलत नव्हते, असे स्पष्टीकरण चंद्रकांतदादांनी सभेत सांगितले. आता शहांशी बोलणे झाल्यानंंतर त्यांचा खोकला पूर्णपणे जाईल, अशी शुभेच्छा पाटील यांनी बापट यांना दिल्या. पक्षाचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्याकडे भोजनाचा कार्यक्रम होता. मात्र अचानाक बैठक ठऱल्याने शहांना आज रात्रीच अहमदाबादला निघायचे होते. मुळीक यांच्याकडील भोजनाचा कार्यक्रम रद्द होतो की काय, अशी स्थिती होती. मात्र कार्यकर्त्याने केलेली तयारी वाया जाऊ द्यायची नाही आणि कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळायचा, हा बाणा शहा यांचा असल्याने त्यांनी मुळीक यांच्याकडील भोजन केल्यानंतरच अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांतदादांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com