'मराठा समाज पेटून उठला तर तुमच्याकडे खाजवायला जागा शिल्लक राहणार नाही'

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दानवे यांनी समाचार घेतला.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

नारायणगाव (जि. पुणे) : आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला जागासुद्धा शिल्लक राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिला. (Ambadas Danve's criticism of Health Minister Tanaji Sawant)

अंबादास दानवे हे आज (ता. २७ सप्टेंबर) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा दुपारी मेळावा झाला. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Ambadas Danve
Supreme Court Result : ‘आमच्यासाठी मोठा विजय; समोरच्यांसाठी आय ओपनर’ : श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, सत्तेसाठी कोल्हे, कुत्रे , लांडगे एकत्र आले आहेत. शिवसेनेतील धनदांडगे गेले मात्र सर्वसामान्य शिवसैनिक जाग्यावरच आहे. आत्मविश्वासाने संघटनात्मक काम करा. लढण्याचा निर्धार करा. आगामी निवडणुकीत क्रांती होईल. मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात मी कुत्रा निशाणी घेऊन निवडणूक लढवली तरी निवडून येईल. लोक म्हणतात या कुत्र्याला मतदान करायचं का. कुत्रा तरी प्रामाणिक असतो.

Ambadas Danve
Supreme Court Hearing : नरहरी झिरवाळ यांनी त्यावेळीच आपले अधिकार गमावले : शिंदे गटाच्या वकिलाचा युक्तीवाद

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दानवे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले क्रांती मोर्चा व मराठा समाज सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. आता तुमचे सरकार आले आहे. मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला जागासुद्धा शिल्लक राहणार नाही. असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

Ambadas Danve
Supreme Court Hearing : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आमदार अपात्रतेचा संबंधच उरत नाही : ॲड जेठमलानींचा युक्तीवाद

केंद्र व राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. शेतीमालाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत, असा भास निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषीमध्ये प्रगत असलेल्या पुणे जिल्ह्यात शेतकरी पंतप्रधान यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो, हे लाजिरवाणी आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कालावधीत एक जुलैपासून राज्यात ३७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सतत पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. नुकसान भरपाई मिळाली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या असत्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.

या वेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, दिलीप बामणे, सरपंच योगेश पाटे, बाळासाहेब पाटे,राम गावडे , उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर, जयवंत घोडके, दिलीप डुंबरे, रशीद इनामदार,चंद्रकांत डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्ताविक तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केले. आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com