Ambadas Danve : अमित शाहांना मुंबईत यावे लागले हा तर शिवसेनेचा नैतिक विजय !

विरोधी पक्षनेते झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंबादास दानवे प्रथमच पुण्यात आले आहेत.
Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shaha) यांना मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वत:ला मुंबईत यावे लागते, यातच शिवसेनेचा नैतिक विजय आहे. प्रत्यक्षात मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजय दैदिप्यमान असेल, हेही त्यांनी लक्षात घ्वावे, असा विश्‍वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पुण्यात व्यक्त केला.

Ambadas Danve
लिझ ट्रस बनल्या ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान; ऋषी सुनक यांचा पराभव

विरोधी पक्षनेते झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच पुण्यात आले आहेत. पुण्यातील काही प्रमुख गणेश मंडळांना दानवे यांनी भेट दिली. पुण्यात आल्यानंतर त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या वेळी बोलताना दानवे राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Ambadas Danve
शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार; शेतीला मोफत वीज देणार : राहुल गांधींची घोषणा

दानवे म्हणाले, ‘‘ मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना अटक करण्यात आली. वास्तविक राज्य सरकारची ही दडपशाही आहे. मात्र, अशा दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. शिवसेनेचा प्रत्येक सैनिक नेहमी जमिनीवरच असतो.शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतो. त्यामुळे आमचा मुंबईतला विजय निश्‍चित आहे.

गेली ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. यावर्षीदेखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवरच हा मेळावा होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा यांच्या संभाव्य युती संदर्भात दानवे म्हणाले, ‘‘ ज्या राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' दाखवून कोणाला टार्गेट केले. ते आता नेमके काय बोलणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष असेल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com