बारामतीचे आलताफ शेख बनले IPS अधिकारी

युपीएससी परीक्षेत (UPSC) महाराष्ट्रातील मुलांचा डंका
बारामतीचे आलताफ शेख बनले IPS अधिकारी

बारामती: जिद्द, चिकाटी व परिश्रमाची तयारी असेल तर ग्रामीण भागातील युवकही आकाशाला गवसणी घालू शकतात ही बाब बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आलताफ शेख यांनी सिध्द करुन दाखविले आहे. शाळेत असताना भजी व चहा विक्रीचे काम केलेले आलताफ आता थेट आयपीएस बनले आहेत. बारामती तालुक्यातील पहिलेच आयपीएस अधिकारी बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे.  

बारामतीचे आलताफ शेख बनले IPS अधिकारी
UPSC Result : महाराष्ट्रातील मुलांनी मिळवलं यश

ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी करिअर अँकॅडमी सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अँकॅडमीतून शिक्षण घेतलेले आलताफ शेख आज आयपीएस बनले. ही गोड बातमी आल्यानंतर काटेवाडी व राष्ट्रवादी करिअर अँकॅडमीत आनंद व्यक्त करण्यात आला.

बारामतीचे आलताफ शेख बनले IPS अधिकारी
युपीएससीत मराठवाड्याचा झेंडा, लातूरच्या नितीशा जगतापसह तीघे उतीर्ण..

आलताफ शेख यांची कहाणी युवकांसाठी प्रेरणादायी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देत ते या अगोदर असिस्टंट कमांडट बनले होते. इस्लामपूर येथे नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेले आलताफ हे विद्यार्थी. पुढे त्यांनी जिद्दीतून फूड टेक्नॉलॉजीतून बी. टेक. ची पदवी प्राप्त केली. 2013 पासून ते बारामतीत वास्तव्यास आहे. सध्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून उस्मानाबाद येथे ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांना मदत करण्याच्या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून 2012 मध्ये राष्ट्रवादी करिअर अँकॅडमीची स्थापना केली गेली. आजपर्यंत 47 राजपत्रित अधिकारी या अकादमीतून तयार झाले असून असंख्य युवक युवती सरकारी नोकरीत स्थिरावले आहेत.  

 पवार कुटुंबियांचे योगदान....

उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी बारामती होस्टेलला पुण्यात राहण्यासह जेवणाचीही सोय केली. त्या नंतर चुलत्यांनीही कर्ज काढून शिक्षणाला हातभार लावला. राष्ट्रवादी करिअर अँकँडमीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे पाठबळ मिळाले, समीर मुलाणी यांनीही मोलाची मदत केली आणि आज आयपीएस होऊ शकलो अशी कृतज्ञतेची भावना आलताफ शेख यांनी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com