Laxman Jagtap : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना उद्या सर्वपक्षीय नेते वाहणार श्रद्धांजली

Laxman Jagtap : अजित पवार, शरद पवारानंतर रोहित पवारांकडूनही जगताप कुटुंबाचे सांत्वन
Laxman Jagtap
Laxman JagtapSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) कारभारी आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला दीर्घ आजाराने निधन झाले. उद्योगनगरीतील सर्व राजकीय पक्षांच्यावतीने त्यांना उद्या (ता.१४) एकत्रित श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक आऱोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री व आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर आदी या सर्वपक्षीय शोकसभेला उपस्थित राहणार आहेत.

Laxman Jagtap
Ravi Rana-Navneet Rana यांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची कारवाई; राजकीय नेत्यांचे बॅनर हटवले

स्व.लक्ष्मण जगताप यांचे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे सर्वपक्षीय अभिवादन होत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे भाजप आमदार आणि पिंपरी-चिंचवड पक्षाध्यक्ष महेश लांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, निवृत्त सनदी अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप बंड आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

तसेच सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व अन्य संस्था, संघटनांचे पदाधिकारीही स्व.लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या अभिवादन सभेला हजर राहणार आहेत.

Laxman Jagtap
BJPचे रणजीत पाटील कोट्यधीश; विवरण पत्रात दाखवली २९,३८ कोटींची मालमत्ता !

दरम्यान, राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे (जि.नगर) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्व.लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी जाऊन त्यांना आज (ता.१३) श्रद्धांजली वाहिली. त्यांनी स्व.जगतापांच्या पत्नी अश्विनी, बंधू शंकर व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांसोबत संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in