पुण्यातील विसर्जन सुनेसुने : पण गप्पांच्या फडात रंगल्या नेत्यांच्या फुगड्यांच्या चर्चा!

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन असा गप्पांचा फड रंगविणे हे केवळ पुण्यातच घडू शकते....
पुण्यातील विसर्जन सुनेसुने : पण गप्पांच्या फडात रंगल्या नेत्यांच्या फुगड्यांच्या चर्चा!
all party leaders from pune

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक यंदा कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झाली. गणेशोत्सव कार्यकर्त्यांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना आणि पुणेकरांना आजचा दिवस सुनासुना गेला. या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येतात, गप्पांचा फड रंगविण्याची परंपरा मात्र कायम पाहिली. 

लक्ष्मी रस्त्यावरील मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे प्रस्थान पालकमंत्री, महापौर यांच्या उपस्थितीत पार पडले की सारे नेतेमंडळी ही गप्पांसाठी एकत्र येतात. लक्ष्मी रस्त्यावरील आझाद क्लाॅथ स्टोअर्समध्ये दरवर्षी प्रमाणे सगळे जमून गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी, पुण्यातील नवीन घडामोडी यावर गप्पा मारतात. ही प्रथा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अंकुश काकडे यांनी सर्वांना येण्याचा आग्रह केला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. सतीश देसाई, संदीप खर्डेकर, भाजप शहर चिटणीस सुनील माने, रवींद्र माळवदकर, दगडूशेठ गणपती मंडळाचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांच्यासह पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे या वेळी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणकीचा अनुभव सांगताना देसाई यांनी या निमित्ताने वेगवेगळे गट एकत्र येत आणि मिसळ खाण्याचा कार्यक्रम त्यानंतर होत असे आणि त्यानंतर त्यावेळी प्रत्येक जण आपापल्या नेत्याच्या बरोबर मिसळ खायला जाई, असे सांगितल्यावर शिवरकर यांनी आम्ही मात्र गाडगीळ साहेबांबरोबर (माजी केंद्रीय मंत्री बॅं. विठ्ठलराव गाडगीळ) फक्त मिसळ खायलाच नाही कर अन्यवेळीही एकत्र असायचो असे सांगत आजच्या मैफलीत हशा पिकवला.

मिरवणुकीपुढे भिन्न पक्षांचे नेते फुगडी घालत, असा किस्सा मोहन जोशी यांनी सांगितला. त्यात सुरेश कलमाडी आणि गिरीश बापट किंवा विठ्ठल तुपे अशी जोडी असे. दोघे वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी फुगडीचा आनंद लुटत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Related Stories

No stories found.