शिंदे गटातील सर्वच आमदारांनी ठाकरेंना शुभेच्छा देताना 'पक्षप्रमुख लिहिण्याचे टाळले

Uddhav Thackeray|CM Eknath Shinde | उद्धव ठाकरे यांचा आज (27जुलै) 62 वा वाढदिवस आहे.
Uddhav Thackeray|CM Eknath Shinde |
Uddhav Thackeray|CM Eknath Shinde |

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आज (२७ जुलै) वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी त्यांना शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असाच उल्लेख केला आहे. आमदारांनी शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करण्याचे टाळले असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहापैकी पाच आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यातील बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि संदिपान भुमरे यांनी आपल्या सोशल मीडिया वरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या अशाच्या पोस्ट केल्या आहेत‌. तर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मात्र आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केला आहे.

Uddhav Thackeray|CM Eknath Shinde |
एकनाथ शिंदे विसरले पण श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंचे पद लक्षात ठेवले...

विशेष म्हणजे बंडखोर आमदार रमेश बोरणारे आणि अब्दुल सत्तार यांनी अद्यापही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री असाच उल्लेख केला आहे.

शिंदे गटातील अनेक आमदारांनी पक्षप्रमुख पदाचा उल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांना अशाच प्रकारे शुभेच्छा दिल्या. पण एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना आवर्जुन पक्षप्रमुख पदाचा उल्लेख केला आहे. ''पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....'' असे ट्विट श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ''शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! श्री. ठाकरे यांना निरोगी दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना!'' असे ट्विट करत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com