`आऊटगोइंग`ची चर्चा असताना भाजपचे सर्व नगरसेवक विद्यार्थी बनून वर्गात हजर

पुणे भाजपमध्ये एकीचे दर्शन दिसल्याने नेते खूष!
bjp shibir
bjp shibir

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरापेक्षा कमी कालावधीवर असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून भाजप नगरसेवकांचा अभ्यासवर्ग मीरा भाईंदर येथील स्व. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे राज्यातील दिग्गज भाजप नेत्यांच्या 'बौद्धिक'नं पार पडला. विशेष म्हणजे अपवाद वगळता सर्वच्या सर्व नगरसेवक या अभ्यासवर्गाला उपस्थित राहिलेल्या भाजप नेत्यांनी सुस्करा सोडला आहे.

भाजपमधून आऊटगोइंग होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास वर्ग झाल्याने त्यास किती नगरसेवक उपस्थित राहणार, याची उत्सुकता होती. विद्यार्थी बनून बहुतांश नगरसेवकांना श्रवणभक्ती केली. त्याचा भाजपला किती लाभ होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

राज्यात भाजपची सत्ता नसताना नगरसेवकांच्या आत्मविश्वासावर झालेला परिणाम आणि काही नगरसेवकांनी पालकमंत्री अजितदादांच्या घेतलेल्या भेटी यावरुन अभ्यासवर्गाला किती नगरसेवक उपस्थित राहतात, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा होत्या. मात्र भाजपच्या पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सर्वच नगरसेवकांना एकाच व्यासपीठावर आणण्यात यश आलं असून यामुळे मोठ्या कालावधीनंतर पुणे भाजपात एकीचं दर्शन घडलं आहे.

'महापालिका निवडणूक आणि सूक्ष्म नियोजन', 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतिहास', 'सोशल मीडिया आणि राजकारण', 'अर्थसंकल्प आणि लोकप्रतिनिधी यांचे कामकाज', 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण' अशा विविध विषयांवर नगसेवकांचे बौद्धिक घेण्यात आले. यात  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री आशिष शेलार, संघटन मंत्री विजय पुराणिक, श्रीकांत भारतीय यांनी पुण्याच्या नगसेवकांशी संवाद साधला. 

अभ्यासवर्गाबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'भाजपात शिस्तबद्ध आणि अभ्यासुपणाला प्राधान्य आहे. याच पार्श्वभूमीवर हा अभ्यासवर्ग आम्हा सर्व नगसेवकांना आगामी काळात मार्गदर्शक ठरणारा आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून भाजपने पुणेकरांसाठी केलेल्या बाबी आम्ही सकारात्मकपणे पुणेकरांसमोर मांडणार आहोत. हा अभ्यासवर्ग आम्हा सर्वांना आगामी काळासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे.``

नवनियुक्त सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, 'आगामी निवडणुकीची दिशा, नियोजन आणि नगरसेवकांना बजावयची भूमिका, याबाबत या अभ्यासवर्गात सविस्तरपणे मंथन झाले. काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देतील असा काहींनी केलेला दावा या अभ्यासवर्गातील नगसेवकांच्या उपस्थितीने मोडीत निघाला आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकसंघ असून सामूहिकरित्या पुणे महापालिकेवर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवणार आहोत.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com