Baramati News : 'कर्तव्यपथा'वर 'सुखोई'तून भरारी घेणाऱ्या बारामतीच्या अक्षय काकडेंनी गाजवला दिवस

Sukhoi Airoplane : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील एका विमानाचे केले सारथ्य
Akshay Kakade
Akshay KakadeSarkarnama

Baramati News : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली (Delhi) येथील वायुदलाची नयनरम्य परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुखोई एमकेआय 30 या विमानांनी 'कर्तव्यपथा'वरुन उत्तुंग भरारी घेत उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविला. या तीन सुखोई विमानांपैकी एका विमानाचे सारथ्य बारामतीचे स्क्वॉडर्न लिडर अक्षय प्रमोद काकडे (Akshay Kakade) यांनी केले. ग्रुप कॅप्टन ए. धनकर व विंग कमांडर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही परेड पार पडली.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भारतीय वायुदलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन देशवासियांना घडविले जाते. यंदा वायुदलाच्या तीन सुखोई (Sukhoi Airplane) विमानांनी हवेत झेप घेत त्रिशूल फॉर्मेशन घडविले. त्यातून देशवासियांना भारतीय वायुदलाचे (Indian Air force) सामर्थ्य दाखवून दिले. त्यातील एका सुखोईचे सारथ्य बारामती (Baramati) येथील अक्षय काकडे यांनी केले.

Akshay Kakade
Ramdev Baba : पेट्रोलनंतर रामदेव बाबांची नवी भविष्यवाणी; म्हणाले "पाकिस्तानचे..."

अक्षय यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर वायुदलात प्रवेश प्राप्त केला. फ्लाईंग ऑफिसर ते स्कॉडर्न लिडरपर्यंतचा प्रवास त्यांनी काही वर्षांत पार केला आहे. दरम्यान त्यांनी वायुसेना अध्यक्ष प्रशंसा पदक प्राप्त केले आहे. अक्षयचे वडील प्रमोद काकडे (Pramod Kakade) उद्योजक आहेत. अक्षय यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पंखांना वडील आणि आई संगीता काकडे यांनी बळ दिले.

अक्षय यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदीरमध्ये झाले. एक दिवस शाळेची सहल खडकवासल्याच्या 'एन.डी.ए.' (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मध्ये गेली होती. तेथील जीवन पाहून प्रभावित झालेल्या अक्षय यांनी येथेच दाखल होण्याची जिद्द बाळगली होती. त्यानुसार त्यांनी खडतर परिश्रम करून तेथे प्रवेश मिळविला.

Akshay Kakade
Shivsena : औरंगाबादमध्ये राजकीय नाट्य : शिंदे-ठाकरे गटाचे नेते बसले शेजारी-शेजारी, पुढे असं काही घडलं की...

'एनडीए'मधील (NDA) प्रशिक्षणानंतर हैदराबाद्च्या एअरफोर्स अकॅडमीमध्ये दाखल होत वर्षभराचे प्रशिक्षण प्राप्त केले. त्यानंतर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच भारतीय वायुदलातील लढाऊ विमाने चालविणारा 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. इतक्या तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी मिळणे ही बाब स्वप्नवतच होते, अशी भावना अक्षय यांच्या पालकांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com