शिंदे सरकारचा अजितदादांना दणका ; बारामतीतील २४५ कोटींच्या कामांना स्थगिती

बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. या कामांना स्थगिती दिल्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांनी दणका दिल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde | Ajit Pawar
Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेलं शिंदे सरकार (eknath shinde) आता ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के देत आहे. ठाकरे सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर आता नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. (Ajit Pawar latest news)

महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार शिवसेना आमदारांची होती. याबाबत या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. पण या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने या आमदारांमध्ये नाराजी होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९४१ कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. मार्च ते जून 2022 मधील दरम्यान मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यात एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. या कामांना स्थगिती दिल्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांनी दणका दिल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde | Ajit Pawar
राज्य घटनेनुसार चालतेयं का ? राज्यपालांना सवाल ; राऊतांनी केला 'तो' फोटो शेअर

तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, तर शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय देण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील कामांना यापूर्वी शिंदे सरकारचा दणका दिला आहे, डीपीडीसीच्या ५६७.८ कोटींच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.

Eknath Shinde | Ajit Pawar
उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार ; भाजपला धन्यवाद, शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ

भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर चिखलीकर यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नांदेड डीपीडीसीच्या कामांना आणि बैठकीला तूर्तास स्थगिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in