अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले; आपण कायद्याचे पालन करणारे; निदर्शने कशासाठी ?

केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले; आपण कायद्याचे पालन करणारे; निदर्शने कशासाठी ?
Ajit Pawar Sarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या व त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर आयकर खात्याने छापे टाकल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निदर्शने न करण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला. आपण कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. त्यामुळे अशी निदर्शने करू नका असे पवार यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले.

गुरूवारी सकाळपासून मंबई, पुणे व कोल्हापुरातील अजित पवार तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांच्या कार्यालयावर आयकर खात्याच्या आधिकाऱ्यांनी छापे टाकत कागदपत्रांची तपासणी सुरू केली. या छाप्यांचे हे सत्र आजही सुरूच होते. त्यामुळे संतापलेल्या पुण्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली कौन्सिल हॉलसमोर निदर्शने केली. बैठक संपवून बाहेर येताना पवार यांनी या कार्यकर्त्यांची भेट घेत अशी आंदोलन करू नका, असे आवाहन केले.

Ajit Pawar
अजित पवार म्हणाले; मी पळून चाललेलो नाही

ते म्हणाले, ‘‘ आपण कायद्याचे पालकन करणारे लोक आहोत. त्यामुळे चौकशी करणाऱ्या यंत्रणांना त्यांचे काम करू द्या. त्यांच्या कामात अडथळा येणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर यावर काय बोलायचे ते मी सविस्तर बोलणार आहे. या संदर्भात करण्यात येत असलेल्या सर्व आरोपांना आपण उत्तर देऊ. अगदी जरंडेश्‍वर कारखान्याच्या मालकीबद्दल प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. त्याचेही उत्तर आपण देऊ ’’

Ajit Pawar
सावधान : जिल्ह्यात दिवसभरात पावणे सहाशे नवे कोरोना रुग्ण

केवळ राजकीय सूडापोटी कारवाई करण्यात येत आहे. बदनामी करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.