मी तिजोरीला चाव्या लावल्या तर काय मिळणार... अजित पवारांनी घेतली भरणेंची फिरकी!

एका कार्यक्रमात मिश्कीलपणे अजितदादांनी भरणेंमामांना आपल्या पदाची आठवण करुन दिली.
Ajit Pawar, Dattatraya Bharne
Ajit Pawar, Dattatraya Bharnesarkarnama

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatraya Bharne) यांना कानपिचक्या दिल्या. एका कार्यक्रमात मिश्कीलपणे अजितदादांनी भरणेंमामांना आपल्या पदाची आठवण करुन दिली.

''निधी घेण्यासाठी मला भरणेमामांना विनंती करावी लागते, मामा मला द्या काहीतरी निधी,'' असे अजितदादा म्हणाले. निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी अजितदादांनी भरणे मामांना शाब्दीक फटकारे लगावले. यामुळे उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले.

Ajit Pawar, Dattatraya Bharne
भाजपला दणका ; BJDच्या सुलोचना दास ठरल्या पहिल्या महिला महापैार

पुणे जिल्ह्यातील निधी वाटपावरुन यावेळी अजितदादा बोलत होते. ते म्हणाले, ''भरणे मामा हे बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहे, त्यांनीही यावर्षी जिल्ह्याला चांगला निधी दिला आहे. मी, सासवडचे आमदार संजय जगताप त्यांना सांगत असतो, मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा. तुम्ही राज्यमंत्री एकट्या इंदापूरचे नाही, तुम्ही राज्याचे राज्यमंत्री आहेत. मला मामांना विनंती करावी लागले, मामा मला निधी द्या,''

Ajit Pawar, Dattatraya Bharne
मंत्र्यांना अडचणीत कोण आणते..गडकरींनी सांगितली ही तीन नावे..

''बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. पण त्या बाबाला हे माहित नाही, की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे. मी तिजोरी उघडली तरच बांधकाम विभागाला पैसे मिळतील. नाहीतर त्यांना काय मिळणार..'' ''आता गाडी घसरायला लागली आहे, आता मी थांबतो,'' अशा मिश्कील शब्दात अजितदादांनी भरणेमामांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com