चुकून का होईना अजित हे पवार चंद्रकांत पाटलांच्या मनातलं बोलले
Ajit Pawar

चुकून का होईना अजित हे पवार चंद्रकांत पाटलांच्या मनातलं बोलले

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव घेतल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव घेतलं. राज्यातील कोरोना निर्बंधावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी अचानक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेण्याऐवजी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले. ज्यामुळे आता त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव अनावधानाने घेतले की जाणीवपूर्वक यावर राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे.

Ajit Pawar
अजित पवारांनी फोन केला की स्क्रिनवर `private number`, असे दिसते..

अजित पवारांच्या या विधानांना उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव राज्य कारभारापासून दूर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पुन्हा हातात कारभार कधी घेणार असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे बरे होत नाहीत तोपर्यंत आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद देण्याची मागणी केली होती. त्यांच्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून ही मागणी केली जात होती. मात्र आज अचानक अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने राज्याचा कारभार नक्की कोणाकडे आहे, याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

नक्की काय घडलं?

पुण्यात पत्रकारांशी संवाद बोलताना, पत्रकारांनी अजित पवारांना राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ‘राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं लागू केली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे निर्णय घेतील.,''असं उत्तर दिलं. मात्र त्याचवेळी अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे पत्रकारांचा काही वेळ गोंधळ उडाला. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानं आता राजकीय वर्तुळाच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar
नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडेंच्या पॅनेलची सरशी

राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत. बोलण्याच्या ओघात अनावधानाने अजित पवारांच्या तोंडून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख झाला असावा, असाही तर्क काढला जात आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्याच्या कारभारापासून दूर आहेत. अशातच त्यांनी एकदा बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील भार हलका केला असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव अनावधानाने घेतलं की जाणीवपूर्वक यावर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in