बारामती, बारामती करू नका : अजितदादांच्या आजी आणि माजी आमदाराला जाहीर कानपिचक्या!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील कार्यक्रमात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच स्पष्ट बोलतात, याचा अनुभव अनेकदा येतो. चाकण एमआयडीसी येथे एका खासगी हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हाच कित्ता गिरवला. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांवरून अनेकदा धुसफूस होत असते किंवा त्यावरून वाद होतात. यावर अजितदादांनी आज थेट प्रहार केला. त्यांच्या या प्रहाराचा फटका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite) आणि माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonwane) यांना बसला. (Ajit Pawar latest news)

सारे प्रकल्प बारामतील नेत असल्याच्या आरोपाबद्दल अजितदादांनी स्पष्टपणे काही मुद्दे आज मांडले. ते म्हणाले की पुणे विमानतळ हे बारामतीला नेलं जाणार नाही. आमदार दिलीप मोहितेंसह अनेकांचे याबाबत गैरसमज झाले आहेत. उगाच सारखं बारामती, बारामती असं ओरडू नका. विमानतळाचे सर्वेक्षण हे संरक्षण खाते करते. मगच त्याची जागा निश्चित केली जाते. झालेलं विमानतळ चोवीस तास सुरू रहायला हवं, त्याअनुषंगाने जागा निश्चित केली जाते. मुंबईनंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं. अशा ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतात. यासाठी येणात उद्योगपती स्वतःचे विमान घेऊन येतात. त्यांना लागलीच परतावे लागते. त्यामुळं पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे गरजेचे आहे. मुंबईतील विमानतळाचा भार कमी करण्यासाठीचं नियोजन सुरुये. पुण्यातील विमानतळ कुठं व्हावं याची पाहणी केंद्रीय हवाई मंत्रालय करत आहे. मुख्यमंत्री देखील यावर लक्ष देऊन आहेत. या सर्वांकडे माझी मागणी आहे की आता या विमानतळाचे काम तातडीनं सुरू करावे, जास्तीची दिरंगाई आता टाळावी.

Ajit Pawar
चंद्रकांतदादांनी शरद पवारांकडे बोट दाखवले अन् अजितदादा म्हणाले, सुचनेला माझं अनुमोदन!

जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नरची बिबट्या सफारी ही बारामतीला नेल्याच्या निषेधार्थ एक दिवसाचे उपोषण केले होते. हे सोनवणे पण आज व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या मुद्यावर अजितदादा म्हणाले की सर्वांची कामे करावीत, अशी शिकवण मला शरद पवार साहेबांनी दिली आहे. कामे करताना, मागण्या पुरविताना काहींची मन दुखावतात. पण गैरसमज करू नयेत, त्यातूनही कारण नसताना काहीजण उपोषणाला बसतात. अरे मला फोन करा ना! मी सकाळी 6 वाजताच काम सुरू करतो, तुमच्या सर्वांसाठी मी उपलब्ध असतो. पण ते काही नाही. लोक उपोषणालाही लगेत बसतात. असे करणे टाळा.

Ajit Pawar
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

आमदार दिलीप मोहिते यांनी या कार्यक्रमात डोमेस्टिक विमानतळाची मागणी या कार्यक्रमात केली होती. तिलाही जागेवरच उत्तर अजित पवार यांनी दिले. एक विमानतळ होता नाकीनऊ आलीे आहे. अन दुसरा डोमेस्टिक विमानतळ द्या म्हणाले. ते काय खेळण्यातले विमानतळ आहे का? उगाच काहीही नको. नाराज होऊ नका, पण वस्तुस्थिती समजून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

मुंबई ते हैदराबाद अशी एक बुलेट ट्रेन होणार आहे, हे आधीच सांगतोय. मुंबई, नवी मुंबई, मावळ, थोडी खेड, हडपसर, पुरंदर, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर ते हैदराबाद अशी बुलेट ट्रेनची आखणी केंद्र सरकार करतंय. यात खूप कमी स्टेशन असणार आहेत. दळणवळण च्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था उभी करण्याची आमची तयारी आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com