अजित पवार म्हणतायेत; घोड कुठं पेंड खातयं, मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही ?

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

पुणे : नव्या सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा असूनदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही. अडचणी काय आहेत. घोड कुठं पेंड खातयं, असा खोचक प्रश्‍न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज टीका केली.

Ajit Pawar
सरकारने केलेली पेट्रोल-डिझेलची दरकपात अत्यंत तोकडी; सामान्यांना फायदा नाही : अजित पवार

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, ‘‘ एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोघे सध्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. १६५ आमदारांचे पाठबळ आहे. तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहे. कुठे तरी घोडं पेंड खात असल्याने अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही.’’

Ajit Pawar
मनसेला मंत्रिपद अन् भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या चर्चा; राजू पाटलांचा मोठा खुलासा

सध्या पाऊस पडत असला तरी पावसाला उशीरा सुरवात झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता अतिवृष्टीने आणखी नुकसान होत आहे. राज्य सरकारने लक्ष देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुन्हा सरपंच आणि नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पण बऱ्याच ठिकाणी सरपंच, नगराध्यक्ष एका विचाराचा आणि बॉडी दुसऱ्या विचाराची असे झाले तर विकासाकामांना खिळ बसते. त्यामुळे या दोघांनी घेतलेला निर्णय लोकशाहीला मारक आहे.’’

Ajit Pawar
नगरसेवक, जिल्हाप्रमुख ते थेट 'मातोश्री'ला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर...

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा द्यायचा निर्णय हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये, अशा शब्दात पवार यांनी कान टोचले.

राज्याला सध्या आपत्ती व्यवस्थापनाला संचालक नाही. अनेक वेळा पुर येतो, ढगफुटी होत असते त्यावेळी मदत व पूर्नवसन विभागाला सचिव महत्त्वाचा असतो. या सरकारचे हे अपयश आहे. ही तर सुरवात आहे यांच्यात आत्तापासून ओढा ओढी सुरू आहे. पुढे महाराष्ट्राला बरेच काही पाहावं लागणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com