‘मला आता पुढच्या निवडणुकीत निवडून देऊ नका...’ : अजितदादा भरसभेत असे का म्हणाले?

सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाला गावोगावी फिरून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
‘मला आता पुढच्या निवडणुकीत निवडून देऊ नका...’ : अजितदादा भरसभेत असे का म्हणाले?
Ajit PawarSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ‘मला आता पुढच्या वेळेस निवडून देऊ नका,’ असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आणि गावकरी चमकलेच! पण, पाठीमागे जॅकेट घालून उभ्या असलेले ग्रामपंचायत सदस्य ॲड. हेमंत गायकवाड या तरुण कार्यकर्त्याकडे पवार यांनी हात केला आणि म्हणाले, ‘आता ह्यानं जॅकेट घातलंय. मी काय घातलं नाही. आता ह्यालाच पुढच्या वेळी निवडून द्या...’ अशी मिश्किली केली. त्यानंतर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. (Ajit Pawar says, 'Don't elect me in next election')

बारामती तालुक्यातील वाघळवाडी विविध विकासकामांचे उदघाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत पवार यांनी फटकेबाजी केली. वाघळवाडी गावातील कार्यकर्त्यांना वडिलकीचे सल्ले दिले आणि सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाला गावोगावी फिरून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सल्लाही दिला.

Ajit Pawar
नाराज नेते शिवसेनेला कुठे घेऊन जाणार...? जाधव, गीते, किर्तीकर आणि आता सावंत!

अजित पवार गावातील कार्यकर्त्यांना म्हणाले की, एकमेकांना पाण्यात बघू नका आणि पुढे जाणाऱ्याला मागे ओढू नका. गैरसमज संपवा. एकजुटीने काम करा. निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावात ४० वर्षे स्मशानभूमीचा प्रश्न सुटला नाही. कुणीतरी जागा द्यायला हवी होती. माझ्या बापजाद्यांची जागा असती तर दिली असती. आता प्रांताधिकारी यांना सांगून जागा मिळवून देऊ आणि स्मशानभूमीला चांगला निधीही देऊ असे आश्वासनही दिले.

Ajit Pawar
शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांस शिवसैनिकांकडूनच मारहाण!

याचवेळी तरुण कार्यकर्ते ॲड. हेमंत गायकवाड हे अजित पवार यांना मध्येच माहिती द्यायचे. अखेर गायकवाड यांच्या जॅकेटवर पवार यांनी कोटी केली. मागे वळून पहात मी काही जॅकेट घातलं नाही, आता ह्या जॅकेटवाल्यालाच निवडून द्या, असे म्हणत गंभीर झालेले वातावरण हलके फुलके केले.

Ajit Pawar
राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटींची कामे आणून आमच्या छाताडावर नाचतो : सावंतांची खदखद!

दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळास म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस जादा केला असला तरी त्यांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे. मी राज्याचे कामकाज बघत असताना संचालक मंडळाने गावोगावी फिरून, लोकांना भेटून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा पण या कामात ते कमी पडत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in