Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Ajit Pawar News : 'तिथे विनयभंंगासारखं काहीही घडलं नाही, पण...'

Ajit Pawar news| आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये

Ajit Pawar पुणे : मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गर्दी होती. तिथे पोलिसही होते. आव्हाड फक्त एका भगिनीला बाजुला करुन स्वत: पुढे निघुन गेले. तिथे विनयभंगासारखा कोणताही प्रकार घडला नाही. पण जाणीवपूर्वक लोक प्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळ आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाडांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Ajit Pawar
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी नलिनी श्रीहरन म्हणते, आता...

अजित पवार म्हणाले की, कार्यक्रम संपल्यानंतर एकनाथ शिंदे ज्या गाडीत बसले होते, तिथला जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या गाडीच्या डाव्या बाजुला तिथे एक पोलिस आफिसरही दिसतात. जितेंद्र आव्हाड एका महिलेला बाजूला करुन निघून गेले. मुख्यमंत्र्यांपासून पाच-दहा फुटांचचं अंतर असेल. तिथे विनयभंगाचा असा कोणताही प्रकार घडला नाही. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे

तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. कशाही प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री झाले असलात तरी राज्यातल्या साडेतेरा कोटी जनतेचं तुम्ही प्रतिनिधीत्व करत आहात. सत्ता येते जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेला नाही, जितेंद्र आव्हांडानी राजीनामा देऊ नये. प्रत्येकाने कायद्याचा संविधानाचा, जनतेचा आदर केला पाहिजे. पण जितेंद्र आव्हाडांनी कोणताही विनयभंग केलेला नाही. त्यांच्यावर असा गुन्हा लावण्याचं कोणतही कारण नव्हतं.

Ajit Pawar
Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

आम्हीही प्रतिनिधी होतो, महाराष्ट्राची निर्मीत झाल्यापासून राजकारण पाहत आलोय पण अलीकडे राज्याच्या राजकारणात गलिच्छ प्रकार घडत आहेत. राजकीय वैचारिक मतभेद, मतमतांतरे असू शकतात. पण असे प्रकार घडत असतील तर महाराष्ट्ररासाठी परवडणाऱ्या नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

आज राज्यात महागाई, बेरोजगारी प्रमुख प्रश्न आहेत. राज्यातून प्रकल्प बाहेर जाण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. हे आताच्या राज्य कर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुरु आहे. ते सांगतात पुर्वीच्या सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. पण आता किती दिवस खडे फोडणार आहात. जुलैपासून आज नोव्हेंबर आला पाच महिने झाले. नव्याचे नऊ दिवस असतात, चांगले काही झाले तर त्यांच्यामुळे चुकीच काही झालं तर मागच्या सरकारमुळे झालं अस राज्य सराकरचं सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com