तुम्ही एवढं ओझ टाकलं की मी तर झोपून गेलोय...!

सोमेश्वर कारखान्याच्या मतदारांचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले कौतुक
तुम्ही एवढं ओझ टाकलं की मी तर झोपून गेलोय...!
अजित पवारसरकारनामा

सोमेश्वरनगर : मी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या सांगता सभेत म्हणालो होतो इतकी मतं द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे. पण तुम्ही इतकी मतं दिली की त्या मताच्या ओझ्याने मी नुसता वाकलो नाही तर पार झोपलोय!," अशी सोमेश्वर कारखान्याच्या मतदारांची प्रशस्ती अजित पवार यांनी केली. मला बारा हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते तुम्ही सोळा हजारांचे दिले आहे. ज्यांनी हे ओझे माझ्यावर टाकले आहे त्यांच्या कष्टाचे चीज होईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

येथील सोमेश्वर सहकारी सा

अजित पवार
अजित पवार म्हणाले होते, ‘मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे...अन्‌ सभासदांनी ते खरे करून दाखवले!

खर कारखान्याचा गव्हाणपूजन व गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. याप्रसंगी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवाकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी. के. पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, तुकाराम जगताप उपस्थित होते.

``चारही तालुक्यात आपले आमदार होते. त्याचा फायदा झाला. तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकरने चोख नियोजन केले. संचालक मंडळाने आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी टीम वर्क चांगलं केलं. त्यातूनही खंडाळा तालुक्यानं एक्क्याण्णव टक्के मतदान आपल्याला केलं. त्यामुळे मला वाटलं होतं १२ हजारांचं लीड मिळेल. परंतु तुम्ही त्यात चार हजार मिळवून सोळा हजारांचं लिड दिलं. राज्यात इतका मोठा विजय कुणाला मिळाला नसेल. हे रेकॉर्ड कुणी मोडेले, असं वाटत नाही. त्यामुळे तुमच्या कष्टाचं चीज होईल असं काम करावं लागणार आहे, अशी प्रशस्ती अजित पवार यांनी केली.

अजित पवार
अजितदादांनी सांगितला लग्नाचा किस्सा.. डायरेक्टर झालो म्हणून पद्मसिंह पाटलांनी दाखवली तयारी!

पुरंदरमधील जवळार्जुन गावाला काहीही कमी केलं नव्हतं. डायरेक्टर दिला, व्हाईच चेअरमनपद दिलं तरी बूथवर माणसं नव्हती. पन्नासच टक्के मतदान झालं. तिथल्या लोकांना बरीच कामं असतात पुढच्या वेळेला काटेवाडीतून बूथ सांभाळायला माणसं पाठवतो, असा संताप पवारांनी व्यक्त केला. शिरष्णे, नाझरे क.प., मोरगाव, जेजुरी याही बूथवर अत्यंत कमी टक्केवारी मतदान झाले, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. तर वाघळवाडी गावाने उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून लावलेले काळे बोर्ड निवडणुकीत चर्चेचा विषय झाले होते. यावरून पवार म्हणाले, वाघळवाडी गावाचं नाव घेतलं तरी मला डोळ्यापुढं काळा बोर्ड दिसतो. वाघळवाडीनं काळा बोर्ड लावला. त्याचं लय वंगाळ वाटतं. साहेबांच्या मतदारसंघातील हे गाव आहे, त्यामुळे जास्त वाईट वाटतं. तुम्हाला राग येणं साहजिक आहे. पण नाराजी वरीष्ठांकडे सांगायची, मागणी करायची. मी तरी २१ च्या उमेदवार देऊ शकत नाही, असेही त्यांनी सुनावले.

राज्य सहकारी बँकेने बारा कारखाने चालवायला देण्यासाठी टेंडर काढलं आहे. ज्यांना कुणाला चांगले चालविण्याची ताकद आहे असे वाटते त्यांनी टेंडर भरावे. ज्याला वाटत असेल आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ शकतो, बोनस-पगार-वाहतूक-तोडणी ही बिले देऊन लोकांना न्याय देऊ शकतो त्यांनी कारखाना चालवायला घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

अजित पवार
अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

अजितदादा नावाचं सुप्रिम कोर्ट

शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे म्हणाले, मी आहे तोवर शेतकरी कृती समिती अजितदादांच्याच मागे राहिल. आतापर्यंत मी कारखान्याचं कामकाज पटलं नाही तर हायकोर्टात जायचो. पण आता माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रिम कोर्ट आहे. त्यामुळे माझ्या मुलाला जरी संचालक मंडळात घेतलं असलं तरी काही चुकीचं वाटलं तर मला अडचणी मांडायला सुप्रिम कोर्ट आहे. संचालक मंडळाने ३१०० रूपये प्रतिटन भाव दिला हे चांगले झाले. आता एकरकमी एफआरपी द्यावी, असे मतही मांडले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in