Ajit Pawar News : "अजित पवार हे आमचे नेते.. ; शरद पवाराच्या वक्तव्यावर अजित पवारांचे `नो कमेंट`

NCP News : अजितदादांनी या नाजूक विषयावर बोलणे टाळत तो आणखी वाढवला नाही.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Pimpri : 'अजित पवार आमचेच नेते आहेत,' या शरद पवारांच्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. त्यावर अजित पवारांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवला.

"अजित पवारांना एकदा संधी दिली,पुन्हा नाही" आणि 'अजित पवार आमचेच नेते आहेत,' या शरद पवारांच्या विधानावर विचारले असता "नो कमेंट" असे म्हणत अजितदादांनी या नाजूक विषयावर बोलणे टाळत तो आणखी वाढवला नाही."विकासाचं बोला ना,"असे दुसऱ्यांदा हाच प्रश्न विचारलेल्या पत्रकाराला त्यांनी सुनावले.

Ajit Pawar
Ajit Pawar News : 'चंद्रकांत' नव्हे 'चांद्रयान'; दिलगिरी व्यक्त करीत अजितदादा म्हणाले...

"तुम्ही साहेबांच्या वक्तव्याकडे कसे पाहता," असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता तुम्ही जसं पाहता त्याच्या उलटं पाहतो,असे अजितदादा म्हणताच मोठा हशा पिकला. त्यावर वक्तव्ये करून वेळ घालवू इच्छित नाही,असे ते म्हणाले.पिंपरी-चिंचवडकरांच्या जंगी स्वागताने अचंबित झाल्याचे सांगत त्यांनी नेहमीच आपल्याला साथ दिली असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

Ajit Pawar
Sunil Tatkare News : शरद पवारांच्या विधानानंतर सुनील तटकरे म्हणाले, "कोणताही संभ्रम नाही.."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२५) पिंपरी-चिंचवडचा दौरा केला.यावेळी त्यांनी महापालिकेत प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेतली. तिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकारीही उपस्थित होते.त्यावर मी शहरात आल्याने ते येणारच असे सांगत त्याचे अजितदादांनी समर्थन केले. त्याचवेळी त्यांना आपण या बैठकीसाठी बोलावले नव्हते,ते स्वत:हून आले,असेही त्यांनी स्पष्ट केले.

"राज्यात कधी नव्हे,ते आता दोनशेपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याने राज्यात नव्याने काही राजकीय बदल वा भूंकप होणार नाही,"असा निर्वाळा उपमुख्यमंत्र्यांनी पालिकेतील आढावा बैठकीनंतर दिला. ओबीसी आऱक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या निवडणुका कधी घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवेल,राज्य सरकार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हीही या निवडणुकांची वाट पाहत आहोत," असे ते म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com