Ajit Pawar News : 'सत्ता गेल्यामुळे ..'; अजित पवारांना कसली खंत वाटते ? म्हणाले..

Ajit Pawar on MLA Fund : सत्ता गेल्यामुळे हे काम झाले नाही," असे अजित पवार म्हणाले.
Ajit pawar Post
Ajit pawar Post Sarkarnama

Ajit Pawar on MLA Fund : राज्याचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आज बारामतीच्या प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन केले. यावेळी सोशल सर्व्हिस सेंटरच्या वतीने गुणवंत कर्मयोगी पुरस्कारांचे वितरण व गुणवंत कर्मचा-यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. (Ajit Pawar on MLA Fund Baramati Maharashtra Day)

यावेळी बारामती परिसरातील विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. आमदारांच्या विकासनिधीबाबत अजितदादांनी भाष्य केलं. "मी अर्थमंत्री असताना एक कोटींवरुन टप्याटप्याने आमदार निधी पाच कोटी रुपये केला होता, यंदा हाच निधी सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा मनोदय होता, पण सत्ता गेल्यामुळे हे काम झाले नाही," असे अजित पवार म्हणाले.

Ajit pawar Post
Sanjay Shirsat On Ajit pawar: अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण,शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले...

"अर्थमंत्रीपदाच्या काळात मी चढत्या क्रमाने आमदारनिधी वाढविला, सत्ता टिकली असती तर यंदा प्रत्येक आमदाराला सात कोटी रुपये निधी मी देऊ केला असता," असे ते म्हणाले.

"या पुढील काळात प्रत्येक गोष्टीसाठी शासकीय निधीवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. "बारामतीतील विविध सेवाभावी संस्थांनी शहरातील एकेका भागाची जबाबदारी स्वीकारुन काम करावे," असे ते म्हणाले.

Ajit pawar Post
Vikas Dangat Criticized Pradip Garatkar: हवेली तालुका समजून घेणं गारटकांना या जन्मात तरी शक्य नाही; दांगट-पाटलांचा हल्लाबोल !

महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसिलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे व स्मिता काळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, प्रभाकर मोरे, शेखर कोठारी, साहिल कोठारी उपस्थित होते.

काल (रविवारी) पिंपरी चिंचवडमधील कोयता गँगने केलेल्या हल्ल्याबाबत अजितदादांनी पोलिसांना सूचना दिली. ते म्हणाले, " बारामती परिसरातही दहशत निर्माण करणा-या सर्वांवर मग तो माझ्या शेजारी बसणारा असला तरी कारवाई करा"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com