`गटातटाच्या राजकारणात माळेगावात गोळीबार झाला, हे पवार साहेबांनाही खटकले`

अजित पवार (Ajit Pawar) यांनी गोळीबार प्रकरणावर आपसे स्पष्ट मत व्यक्त केले.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

माळेगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्ट बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बारामती मतदारसंघातील माळेगाव येथे गोळीबाराच्या (Ajit Pawar on Malegaon firing incident) घटनेने तेथे राजकीय तणाव झाला होता. त्याबाबत त्यांनी आज स्पष्ट मत व्यक्त केले. या गावात पवारांना मानणारे बहुसंख्य मंडळी असताना तेथे हा प्रकार घडल्याने पोलिसांसह राजकीय वर्तुळालाही धक्का होता. (Ajit Pawar latest news)

माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे रोहिणी रविराज तावरे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद गटामधील विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य, विविध ग्रामपंचायतींना कचरा कुंड्या, तसेच भजनी मंडळांना साहित्य वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने आयोजित जाहिर सभेत पवार बोलत होते.

Ajit Pawar
भर कार्यक्रमातच अजित पवारांसमोर तक्रार; बारामतीचे प्रांत पाच लाख मागत आहेत...

कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार प्रकरणाचा धागा पकडत पवार म्हणाले, `` पवारसाहेब हे माळेगाव नगपंचायतीच्या हद्दीत राहतात. याशिवाय येथील कार्य़रत शिक्षण संस्था, साखर कारखान्यांसारखे छोटेमोठे उद्योग व्यवसाय आणि सर्व जातिधर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. असे असताना गटातटाच्या राजकारणापायी येथे गोळीबार होतो, हे बारामतीकरांच्या दृष्टीने आणि आम्हा लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने अतिशय अशोभनिय गोष्ट आहे. पवारसाहेबांनाही ती गोष्ट खटकली. त्यामुळे पोलिसांना माझी सूचना राहिल, की माझ्या जवळचा असो अथवा दुसऱ्या पक्षाचा असो जो कोण कायदा हाताता घेईल त्याला तडीपार करा, त्यावरही त्याच्यामध्ये बदल होत नसेल, तर थेट मोक्का कारवाई करून टाका. त्यासाठी आम्हा राज्यकर्त्यांच्या आदेशाची वाट पाहू नका,`` अशा शब्दात त्यांनी समाजामध्ये असुरक्षित वातावरण तयार करणाऱ्यांचा समाचार घेतला.

Ajit Pawar
Video: महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कोणीही वापरु नये; अजित पवार

यावेळी माळेगावकरांना गटातटाच्या राजकारणात न पडता विकासाला महत्व देत एकत्र येण्याचे आवाहन पवार यांनी केले.  ते म्हणाले, `` बारामती शहराच्या तुलनेत माळेगावचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी अर्थ विभागाच्या माध्यमातून कोठ्यावधी रूपये मंजूर केले आहेत. त्यामध्ये पंचायतीची प्रशस्त इमारत, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, दिवाबत्तीच्या सुविधा पुर्णत्वाला येणार आहेत. अर्थात या गोष्टी कमी कालावधित अधिक दर्जेदार करण्यासाठी आगामी माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक खूप महत्वाची आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील गटातटाचे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही,``असाही इशारा पवार यांनी यावेळी दिला.

माळेगाव नगरपंचायतीला मिळणार गायरान क्षेत्र...!

माळेगाव नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्याने येथे विकास कामांसाठी जागेची उलब्धता होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या गावातील गायराण क्षेत्र महसूल विभागाने ताब्यात घेवून नगरपंचायत प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, त्यानंतर गावात अधिकच्या जमिनी असतील त्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकण्य़ाचा विचार केला जाईल. याशिवाय नीरा-बारामती हा राज्यमार्गही रुंदीकरणाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहे.  त्याकामीही संबंधित गावकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन पवार यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in