इतर प्रश्नांना लांबलचक उत्तरे देणारे अजितदादा या सवालावर मात्र हमखास चिडतात..

अजित पवार (Ajit Pawar) यांची नाराजी या प्रश्नांवर लपून राहत नाही..
Ajit Pawer

Ajit Pawer

Sarkarnama 

पुणे : माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतचा सकाळी सकाळी झालेला शपथविधी हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पाठ सोडत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषय उपस्थित झाला. सुधीर मुनगंटिवार यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजितदादांना समोरून टोमणा मारला. दादांनी अहो, तो शपथविधी पहाटे नाही तर सकाळी आठ वाजता झाला होता, असे अधिकृतरित्या जाहीर करून टाकले. या शपथविधीबद्दल अजितदादांनी अधिकृतरित्या दिलेली ही माहिती एवढीच. या व्यतिरिक्त एकही जादा शब्द ते या संपूर्ण विषयावर गेल्या दोन वर्षांत बोललेले नाहीत.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawer </p></div>
...म्हणून तेव्हा अजितदादा आणि आमदार परत आले!

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गाजलेल्या शपथविधीवर काही पुस्तके निघाली. यातील महत्वाचे पात्र असलेले फडणवीस त्याविषयी बोलले आहेत. शरद पवार, संजय राऊत हे नेते अधूनमधून यावरच्या आठवणी सांगत असतात. पण या साऱ्या नाट्यात फडणविसांपेक्षाही प्रमुख पात्र असलेल्या अजितदादांना हा विषय मात्र नकोसा वाटतो. त्यांचे यावर एकच उत्तर ठरलेले असते. अजित पवार हे यासंबंधीच्या प्रश्नांवर चिडतात, हे अनेकदा अनुभवास आलेले आहे. इतर कोणत्याही विषयावर पत्रकारांच्या प्रश्नांवर भरभरून बोलणाऱ्या अजितदादांना हा प्रश्न मात्र नकोसा वाटतो. त्यांचे नेहमीचे उत्तर ते चिडक्या स्वरात देतात. ते म्हणजे,` ``वेळ आल्यावर बोलेन,``

<div class="paragraphs"><p>Ajit Pawer </p></div>
अजितदादांना फडणवीसांसोबत सरकार स्थापनेसाठी तुम्हीच पाठवलं होतं का? शरद पवार म्हणाले..

शरद पवार यांनी 29 डिसेंबर रोजी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना पुन्हा या शपथविधीच्या वेळचा प्रसंग विचारण्यात आला होता. ``तुम्हीच (म्हणजे शरद पवारांनी) अजितदादांना भाजपकडे शपथविधीसाठी पाठविले होते, अशी चर्चा असते. त्यावर तुमचे मत काय, या प्रश्नावर पवारांनी गुगली उत्तर दिले. ``मीच अजित पवारांना पाठविले असते तर त्यांनी ते काम अर्धवट ठेवले नसते,`` असे सांगून हशा आणि टाळ्या वसूल केल्या. पण त्यातून थेटपणे प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. मात्र त्या आधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीशी युती करण्याची तयारी दाखवली होती आणि तशी ऑफर यांनी दिली होती, अशी माहिती पवार यांनी दिली. मात्र तो प्रस्ताव नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवारांच्या या मुलाखतीनंतर आज (30 डिसेंबर) रोजी अजितदादांना पुन्हा याविषयी विचारण्यात आले. त्यांनी चिडलेल्या स्वरात सांगितले की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याविषयी एकदा भूमिका मांडल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यावर बोलण्याची गरज नाही. मी योग्य वेळ आल्यावर बोलेन!`

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com