अधिकारी-कार्यकर्त्यांना दटावणारे अजितदादा शिक्षकांच्या भूमिकेत; विद्यार्थ्यांना म्हणाले...

Ajit Pawar | NCP | : अजित पवार बारामतीमध्ये शिक्षकाच्या भूमिकेत.
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेकदा कामचुकार अधिकाऱ्यांवर आणि चुकणाऱ्या कार्यकर्त्यांवर ओरडताना आणि दटावताना पाहिले आहे. मात्र आज पहिल्यांदाच थेट विद्यार्थ्यांना ओरडल्याने अजित पवार यांना महाराष्ट्राने शिक्षकाच्या भूमिकेत पाहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्येही काहीशी शांतता पसरल्याचे दिसून आले. बारामती येथे सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरच्या उद्धाटन कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. (Ajit Pawar Latest News)

नेमके काय झाले बारामतीमध्ये?

बारामतीमध्ये साकारलेल्या सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगीच्या कार्यक्रमात अचानक घडलेला हा प्रसंग एकच चर्चेचा विषय ठरला. सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्याध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या वक्त्यांची भाषणे सुरू होती. मात्र त्याचवेळी कार्यक्रम स्थळी उभारलेल्या विद्यार्थ्यांच्या गॅलरीमध्ये खूपच गोंधळ आणि आवाज येत होता.

डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या वक्त्यांच्या भाषणादरम्यानचा विद्यार्थ्यांचा गोंधळ अजित पवारांना आवडला नाही. त्यामुळे स्वतःचे भाषण संपविण्याच्या आगोदर ते संबंधित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, ``माझ्या नंतर पवारसाहेबांचे भाषण आपल्याला ऐकायचे आहे. मला येथे अजितबात आवाज नकोय, अन्यथा पोलिसांना बोलावून हॉलच्या बाहेर पाठवेन.`` दादांच्या या अचानक काहीश्या संतप्त स्वरात आणि दटावण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या एकच शांतता पसरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com