लक्ष्मण भाऊंसाठी नवसंजीवनी ठरलेले अमेरिकेचे इंजेक्शन अजितदादांनी मिळवून दिले

Laxman Jagtap | Ajit Pawar | : अजित पवारांनी राजकारणापेक्षा जपली राजकारणातील मैत्री
लक्ष्मण भाऊंसाठी नवसंजीवनी ठरलेले अमेरिकेचे इंजेक्शन अजितदादांनी मिळवून दिले
Laxman Jagtap| Ajit Pawar News, Laxman Jagtap Latest News Updates, Laxman Jagtap Newssarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून गेल्या आठवड्यापासून दाखल आहेत. दाखल केले तेव्हा त्यांची तब्येत बरीच अत्यावस्थ होती. मात्र ३ दिवसांपूर्वी अमेरिकेतून मागविण्यात आलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. ते प्रतिसाद देवू लागले असून त्यांचे व्हेंटीलेटरही काढण्यात आले आहे. त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारे नवसंजीवनी ठरले आहे. (Laxman Jagtap Latest News Updates)

पण लक्ष्मण जगताप यांना हे इंजेक्शन मिळवून देण्यात त्यांचे जुने मित्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खूप मोठी मदत झाली अशी माहिती, आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सरकारनामाला आज (ता.२१) दिली. या इंजेक्शननंतर आमदार जगताप कालपासून (ता.२०) प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असले, तरी त्यांना बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे, असेही शंकर जगताप यांनी सांगितले.

Laxman Jagtap| Ajit Pawar News, Laxman Jagtap Latest News Updates, Laxman Jagtap News
Osmanabad : अजित पवारांनी चालवायला घेतलेले दोन्ही कारखाने फायद्यात, साखर उताराही चांगला..

गत आठवड्यात पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी सर्व प्रस्तावित कार्यक्रम रद्द करुन थेट रुग्णालय गाठले. यावेळी आमदार जगताप यांना तातडीने एका इंजेक्शनची गरज असून, त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून तातडीने परवानगी घ्यावी लागणार असल्याचे अजित पवार यांना समजले. त्यानंतर त्यांनी सूत्र हालवून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांना संबंधित इंजेक्शन मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घेण्याची विनंती केली.

राज्य सरकारकडून सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या मदतीने अमेरिकेतून संबंधित इंजेक्शन भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. या इंजेक्शनच्या एका डोसनेच आमदार जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तूर्तास त्याची आणखी गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जरी ते लागले, तरी आता त्याचा परवाना वरील सर्वांच्या एकत्रित सहकार्याने मिळाला असल्याने ते पुन्हा आणण्यात अडचण येणार नाही, असे ते म्हणाले.

Laxman Jagtap| Ajit Pawar News, Laxman Jagtap Latest News Updates, Laxman Jagtap News
बदल्यांच्या आदेशाला स्थगिती म्हणजे पुन्हा घोटाळा? : फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

भाजपमध्ये २०१४ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी आ. जगताप हे अजितदादांचे निकटचे सहकारी होते. राष्ट्रवादीत असताना ते २००४ ला पिंपरीचे महापौर झाले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ रोजी ते आमदार देखील झाले. मात्र आमदार जगताप आणि भोसरीचे सध्याचे आमदार महेश लांडगे हे २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. त्यांच्यामुळे पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जावून प्रथमच भाजप सत्तेत आली.

तरीही त्याबाबत कसलाही कडवटपणा न ठेवता भाऊंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच अजितदादा लागलीच रुग्णालयात धावले. आपल्यापरीने शक्य ती सर्व मदत करण्याचे त्यांनी नुसते आश्वासनच दिले नाही, तर ते पाळलेही. पक्षभेद विसरून राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि समन्वयक व प्रवक्ते योगेश बहल हे सुद्धा अजितदादांबरोबर भाऊंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.