अजित पवार भडकले; म्हणाले मी कुणाच्या दबावाखाली काम करीत नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
ajit pawar1.jpg
ajit pawar1.jpg

पुणे : माझी काम करण्याची पद्धत पारदर्शक आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कुणाच्या दबावाखाली घेत नाही. मुळात मी कुणाच्याही दबावाखाली काम करीत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. दुकानांना वेळ वाढवून देण्याचा निर्णय पुण्यातील व्यापाऱ्यांच्या दबावाखाली घेण्यात आला काय या प्रश्‍नावर पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले.(Ajit Pawar erupted; Said I don't work under any pressure)

जुन्या पत्रकारांना विचारा असे सांगत त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीचे समर्थन केले. मेट्रो ट्रायलवरूनही त्यांनी विरोधकांनी सुनावले. मेट्रोच्या ‘ट्रायल रन’चे उद्घाटन कोणाच्याही हस्ते होऊ देत, पुणे मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार,’ असे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात स्पष्ट केले. संदर्भात पवार म्हणाले, ‘प्रत्येकजण आपापले काम करीत असतो. मेट्रो ट्रायलवर इतके भडकण्याची गरज काय? त्या कार्यक्रमास महापौर आणि भाजपचे इतर पदाधिकारीही हजर होते. कोरोनामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता तो कार्यक्रम घेण्यात आला, असे पवार यांनी स्पष्ट केले.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होते. राज्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी उत्साहाला मुरड घातली पाहिजे. बंधने पाळली पाहिजेत. त्याला पर्याय नाही,’ असे पवार यांनी सांगितले.राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

 देशातील काही इतर राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. राज्यात काही पालकांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत सूतोवाच केले आहे. परंतु राज्यात याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.धार्मिक स्थळांचा निर्णय सरकारच्या स्तरावर धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com