Ajit Pawar : डॉ. लहानेंना 'या' दोन पक्षांकडून खासदारकीची ऑफर होती, त्याचा मी साक्षीदार: अजित पवारांचा गौप्यस्फोट!

Baramati News : "तात्याराव लहाने यांना काही अडचणींतून जावे लागले. त्याचाही मी साक्षीदार"
Ajit Pawar Baramati News Tatyarao lahane
Ajit Pawar Baramati News Tatyarao lahaneSarkarnama

Baramati News : ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao lahane) यांना राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आणि भाजपकडून खासदारकीची ऑफर होती; परंतु डॉ. लहाने यांनी ती ऑफर नाकारून आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे, असे ठामपणे सांगितले, असा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना केला.

बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी डॉ. लहाने यांच्या खासदारकीबाबत विधान केले. अजित पवार म्हणाले की, "डॉ. तात्याराव लहाने यांचे नेत्र विभागात दैदिप्यमान काम आहे. त्यांनी या क्षेत्रात अगदी जीव ओतून काम केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे काम पाहून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून खासदारकीची ऑफर देण्यात आली होती. त्याचा मी साक्षीदार आहे.ते जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून निवडणुकीला उभे राहिले असते, तर दोन मिनिटांत निवडून आले असते. कारण त्यांचे काम आहे. परंतु तात्याराव लहाने यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाला प्राधान्य दिले आणि ही ऑफर नाकारली."

Ajit Pawar Baramati News Tatyarao lahane
Bageshwar Maharaj News: पोलिसांनी कारवाई केली नाही, चमत्काराचे दावे करणाऱ्या बागेश्र्वर महाराजांचा ‘आका’ कोण?

"बिनकामाची माणसं निवडून येत नाहीत. कामाचीच माणसं निवडून येतात. तात्याराव लहाने यांनी माझा पिंड हा वैद्यकीय क्षेत्र आहे, त्यामुळे मला हेच काम करू द्या," असे त्यावेळी सांगितले होते, असेही पवार यांनी नमूद केले.

Ajit Pawar Baramati News Tatyarao lahane
Mahavikas Aghadiचं ठरलं, नाशिकमध्ये शुभांगी पाटील, तर नागपुरात अडबालेंना पाठिंबा...

"तात्याराव लहाने यांना काही अडचणींतून जावे लागले. त्याचाही मी साक्षीदार आहे, परंतु तात्याराव लहाने यांचे काम प्रभावी होतं, त्यामुळे ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले. त्यावेळी त्यांना प्रचंड त्रास झाला. कुठलेही यश असं तसं मिळत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. कधी कधी आपल्यावर आरोप झाले तर त्यामुळे नाउमेद न होता काम करत राहिले पाहिजे. त्या पद्धतीने तात्याराव लहाने यांची वाटचाल राहिली आहे," असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in