निवडणूक आली की आमच्या विरोधकांच्या अंगात येते : अजित पवार बरसले

माळेगाव नगरपंचायतीला विरोध करणाऱ्या रंजन तावरे यांच्यावर अजित पवारांची टीका
Ajit Pawar-Ranjan Taware
Ajit Pawar-Ranjan TawareSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : ‘‘निवडणूक आली की माळेगावातील आमच्या विरोधकांच्या अंगात येते. विधानसभा असो अथवा माळेगाव कारखाना, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक असो, कोणतीही निवडणूक येथील विरोधक काहीतरी मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करत असतात,’’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माळेगाव नगरपंचायतीला विरोध करणारे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे (Ranjan Taware) आणि भाजप (BJP) नेत्यांचा नाव न घेता समाचार घेतला. (Ajit Pawar criticizes Ranjan Taware for opposing Malegaon Nagar Panchayat)

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील राजहंस संकुलाच्या नुतनीकरण इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी आयोजित सभेत पवार बोलत होते. माळेगाव नगरपंचायत शासकीयस्तरावर नव्याने अस्तित्वात आली आहे. ही प्रकिया पूर्णतः नियमानुसार पार पडली आहे. या नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाला भाजप विचारांच्या काहींनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरही लवकरच मार्ग निघेल, अशी माहिती पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दीपक तावरे यांचे नाव घेत स्पष्ट केली.

Ajit Pawar-Ranjan Taware
अजितदादांच्या कट्टर समर्थक राजश्री बोरकरांचा जिल्हा बॅंकेसाठी अर्ज : आशा बुचकेही विरोधात लढणार

अजित पवार म्हणाले की, बारामती तालुक्याच्या राजकारणामध्ये माळेगावला विशेष महत्व आहे. या गावात पवारसाहेब राहतात आणि माळेगाव साखर कारखाना हा पवारसाहेबांचा कारखाना म्हणून राज्यात ओळखला जातो. असे असले तरी येथील अनेकजणांना धरसोडीचे राजकारण करताना मी पाहिले आहे. या गावातील आमचे विरोधक प्रत्येक निवडणुकीत काहीतरी मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करत असता. अर्थात लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे.

Ajit Pawar-Ranjan Taware
...तर सरकार कसे चालवायचे? : अजित पवारांचा सवाल

दरम्यान, माळेगावमधील धरसोडीच्या राजकारणाचा धागा पकडून अजित पवार यांनी सांगितले की, माळेगावमधील धरसोडीचे राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे माळेगावात आता कार्यकर्त्यांना सोयीची भूमिका घेता येणार नाही. पक्षाच्या आदेशानुसार काम करावे लागणार आहे.

दादांचे रोखठोक उत्तर आणि सभेत एकच खळबळ!

माळेगावच्या सभेत कार्यकर्ते अविनाश भोसले यांनी थेट दादांना सवाल केला की यंदाच्या निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळेल का? लागलीच दादा म्हणाले... की, माळेगावबाबत आम्ही जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच राष्ट्रवादीचे तिकीट देणार आहोत. त्यामुळे जो कार्यकर्ता त्या निकषांमध्ये बसेल, त्याला तिकीट हे मिळणारच आहे. दादांचे हे रोखठोक उत्तर मिळताच सभेत एकच खळबळ उडाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com