अजित पवारांनी केंद्र सरकारला ठणकावले; आता पुन्हा या ना त्या कारणाने दर वाढवू नका!

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) आणि गॅसचे दर कमी केले आहेत.
 Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

माळेगाव : केंद्र सरकारने (Central Government) इंधनाच्या दरात कपात केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. ही गोष्ट खरी आहे, मात्र, अधिकची इंधन दरवाढ करायची आणि पुन्हा जनतेच्या आक्रोश विचारत घेत इंधनाचे दर कमी करायचे, हे कितपत योग्य आहे. यापुढे तरी कमी झालेले दर  केंद्राकडून पुन्हा यानात्या कारणाने वाढू नयेत हीच जनतेची अपेक्षा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्राच्या निर्णयाचा समाचार घेतला. महाराष्ट्र सरकारनेही अर्थसंकल्पामध्ये गॅस सिलेंडरची किंमत कमी होण्यासाठी एक हजार कोटींचा टॅक्स कमी केल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. (Ajit Pawar Latest Marathi News)

 Ajit Pawar
पवार, राऊत आणि संभाजीराजे दिल्लीत नियमित भेटत होते.... तेव्हाच ठरवले जात होते..

अजित पवार (Ajit Pawar) आज बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींची संवाद साधला. इंधन दर कपात, गॅस सिलेंडरवरील टॅक्स कमी करणे, उजनीचे पाणी, आगामी पालखी सोहळ्याचे नियोजन आदी प्रश्नांवर पवारांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ''महाराष्ट्रासह देशभर इंधन दरवाढीबाबत जनतेमध्ये आक्रोश होता. प्रसारमाध्यमांनीही केंद्राच्या भूमिकेविरुद्ध आवाज उठविला होता. त्यामुळेच केंद्राने पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्यासाठी निर्णय घेतला.

 Ajit Pawar
भाजपला मोठा धक्का; अमित शहांच्या दौऱ्याआधी खासदार ठोकणार पक्षाला रामराम

वास्तविक केंद्राने सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात इंधन, दरवाढ केली होती. आता हेच दर कमी केले आहेत. ठिक आहे गॅससह पेट्रोल, डिझेल प्रतिलिटर कमी झाल्याचे समाधान आहे. मात्र, यापुढे पुन्हा इंधनाची दर वाढ केंद्राने करू नये. अन्यथा जागतिक पातळीवर इंधनाचे दर वाढल्याने पुन्हा दर वाढ केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता असे केंद्राकडून होऊ नये, अशी जनतेची अपेक्षा आहे. ''महाराष्ट्र सरकारनेही गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्यासाठी अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडरवर असणारा साडेतेरा टक्के टॅक्स साडेदहा टक्क्याने कमी केला. त्यामुळे राज्य सरकारला १ हजार कोटींचा टॅक्स सोडून द्यावा लागला. परिणामी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्याने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com