सरकारने केलेली पेट्रोल-डिझेलची दरकपात अत्यंत तोकडी; सामान्यांना फायदा नाही : अजित पवार

Ajit Pawar | NCP | Eknath Shinde : व्हॅट 50 टक्क्यांवर का आणला नाही?
Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

पुणे : शिंदे सरकारने राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यानंतर पेट्रोलचे दर प्रतीलिटर 5 आणि आणि डिझेलचे 3 रूपयांनी कमी झाले आहेत. पण सरकारने केलेली ही द7रकपात अत्यंत तोकडी असून त्याचा सामान्य नागरिकांना काही फायदा होणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar | NCP | Latest News)

पवार पुढे म्हणाले, मी अर्थमंत्री असताना सीएनजीवरील टॅक्स 13 टक्क्यावरून 3 टक्क्यावर आणला होता. त्यामुळे तिजोरीवर 1 हजार कोटी रूपयांचा भार सरकारवर पडला होता. त्यावेळी विरोधी पक्षातील भाजपने इंधनावरील व्हॅट 50 टक्क्यांवर आणण्याची मागणी केली होती. मग आता सत्तेत आल्यानंतर व्हॅट 50 टक्क्यांवर का नाही आणला? असा सवालही पवार यांनी केला. तसेच 50 टक्क्यांनी व्हॅट कमी केल्यास डिझेल 11 आणि पेट्रोल 17 रूपयांनी कमी झाले असते, पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही अशी टीकाही त्यांनी केली.

आधी विरोधी पक्षात असताना एक मागणी करायची आणि सत्तेत आल्यानंतर वेगळे निर्णय घ्यायचे असे काम सध्या राज्यात सुरू आहे. उद्या केंद्र सरकारकडून भाव वाढवले जातील आणि त्यामुळे परत इंधनाचे दर वाढतील, अशी शंका उपस्थित करत सध्या राज्य सरकार पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला आहे. राज्यात सध्या हे दोघेचं मालक आहेत आणि सगळा भार यांच्याच खांद्यावर आहे असा टोलाही त्यांनी शिंदे आणि फडणवीसांवर लावला आहे.

हे सरकारचे अपयश :

दरम्यान, राज्य सरकारने अद्याप आपत्ती आणि व्यवस्थापन संचालकांची नियुक्ती केलेली नाही. सध्या पावसाळा सुरू असताना बऱ्याच दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यासाठी आपत्ती आणि व्यवस्थापन विभागाला पूर्णवेळ संचालकांची आवश्यकता आहे. अनेक वेळा महापूर, पूर येतो, ढगफुटी होत असते त्यावेळी मदत खात्याला देखील सचिव महत्त्वाचा असतो, पण यांची नियुक्ती करण्यात आलेली नसून हे या सरकारचे हे अपयश आहे, असाही आरोप पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com