Ajit Pawar On Raj Thackeray : राज ठाकरेंना नकलांशिवाय दुसरं येतंय काय? अजित पवारांनी उडवली खिल्ली !

Ajit Pawar Criticize to Raj Thackeray : मनसेचे १३ आमदार होते, आता एकच आमदार आहे.
Ajit Pawar Criticize to Raj Thackeray :
Ajit Pawar Criticize to Raj Thackeray : Sarkarnama

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (दि.६ मे) रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी नकला करण्याशिवाय काय येतंय? अशी खोचक प्रतिवार अजित पवारांनी केला. आज पुण्यात अजित पवार हे माध्यमांशी संवाद साधत होते.

Ajit Pawar Criticize to Raj Thackeray :
Beed News : बीडमध्ये चाललंय काय ? आमदाराच्या धमकीनंतर कृषी अधिकारी रजेवर..

राज ठाकरे यांना नकला करण्याशिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणे राज ठाकरेंचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना लोकांनी कधीच नाकारलेलं आहे. पूर्वी त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. पुढच्या वेळी एकच आमदार निवडून आला. आमचे जुन्नरचे सहकारी असलेले शरद सोनवणे यांनी तिकिट घेतलं, म्हणून एक तरी पाटी लागली. आता कल्याणचेच एक सहकारी निवडून आले आहेत. बाकी, त्यांच्याबरोबर जे कोणी होते, काही जण सोडले तर सर्वच लोकं दूर गेली, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Criticize to Raj Thackeray :
Ajit pawar Latest news: जे माझ्यावर खुप प्रेम करतात तेच...; नाराजीच्या चर्चांवर अजित पवार स्पष्टचं बोलले...

राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी, त्यांनी अजित पवारांवर मिमिक्री करणं अन् अजित पवार (Ajit Pawar) यांचं व्यंगचित्र काढणं, यातच त्यांना समाधान वाटतं, यात त्यांना समाधान वाटत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.

Ajit Pawar Criticize to Raj Thackeray :
Abhijit Patil Join NCP: साखर कारखानदारीत मोठा दबदबा असणाऱ्या अभिजीत पाटलांनी हाती घेतलं घड्याळ...

अजित पवार पुढे म्हणाले, "शरद पवार आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका घेतल्यानंतर आम्ही कुठलीही प्रतिक्रीया देत नाही. जी त्यांची भूमिका तीच पक्षाची भूमिका आहे. आता राजीनाम्याचा विषय संपला आहे. पवार साहेबांना जे सागांयचं होतं ते त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. काल पवार साहेब बारामतीतही तुमच्याशी बोलले. त्यामुळे जे साहेबांचं मत ते आमच्या सगळ्यांच मत आहे," असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com