ajit-dada-unites-brothers
ajit-dada-unites-brothers

अजित पवारांच्या पुढाकाराने पुढाकाराने दोन भावांमधील वैर संपले- झाली गळाभेट !

अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सरपंचपद यावे यासाठी या दोन भावांचे मनोमिलन घडवून आणले खरे, पण आता अजित पवारांना भावा - भावातील भांडणे मिटविण्यासाठी राज्यभरातुन आणि विविध पक्षातून पुढाकार घेण्यासाठी आप्तेष्टांचीनिमंत्रणे येतील अशी चर्चा आहे .

माळेगाव :  राजकारणामुळे घराघरात भांडणे लागतात . सख्खे भाऊ पक्के वैरी बनतात . पिढ्यान पिढ्या भाऊबंदकीचे नाट्य रंगातच जाते .

 माळेगावच्या राजकारणात रविराज तावरे आणि रणजित तावरेंची ओळख एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून आजपर्यंत होती . पण अजित दादांनी जादूची कांडी  फिरवली आणि राजकीय वैर विसरून दोन्ही भावंडांनी एकमेकांची आज गळाभेट घेतली . 

माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या राजकारणात   रविराज तावरे व रणजित तावरे हे दोघे सख्ये मावसभाऊ...परंतु एकमेकांचे कट्टर विरोधक सरपंच पदाच्या राजीनामा नाट्यावर पडदा टाकण्यासाठी अखेर एकत्र आले. हे घडले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे  !

 दोघा भावांची अचानक घडलेली गळाभेटी गावात एकच खळबळ उडविणारी ठरली. शेवटी अजितदादा...ठरले दोन भावांमधील दुवा...अशीच जोरदार चर्चा सर्वत्र होती. 

माळेगाव (ता.बारामती) ग्रापंचायतीचे सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी मंगळवार (ता.26) रोजी आपल्या पदाचा राजीनामा  पंचायत समिती सभापती संजय भोसले यांच्याकडे सुपूर्द केला होता.

परंतु हा राजीनामा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या बैठकीत मंजूर करून घेणे आणि ठरल्या प्रमाणे राष्ट्रवादीच्या विचाराचे सदस्य राजेंद्र चव्हाण यांना सरपंद पदावर संधी देणे, या गोष्टी पुर्णत्वाला आणण्यासाठी कार्यकर्ते रविराज तावरे व रणजित तावरे यांची गळाभेट होणे तितकेच गरजेचे होते. 

या तावरे बंधूंचे ग्रामपंचायतीच्या राजकारणात प्रमुख दोन गट आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींनी शनिवारी या  तावरे बंधूना एकत्र आणून त्यांची गळाभेट घडवून आणली. 

परिणामी आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन भावांमधील राजकिय संघर्ष मावळल्याचे स्पष्ट झाले. 

या प्राप्तस्थितीमुळे 17 पैकी 10 सदस्य सध्यातरी राष्ट्रवादीच्या गोटात  असल्याचा दावा संबंधित पदाधिकाऱ्यांनी केला.

त्यामध्ये सरपंच जयदीप तावरेंसह उपसरपंच मोहिनी बनसोडे, राजेंद्र चव्हाण, रेखा मोरे, विजयमाला पैठणकर, वर्षा पडर, रविंद्र वाघमोडे, वृषाली तावरे, प्रियदर्शनी वाघमोडे, अविनाश तावरे इत्यादींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

 याबाबत रविराज तावरे म्हणाले,`` राष्ट्रवादीचा विचार, गावाचा विकास आणि अजितदादांचा शब्द, या गोष्टींला आम्ही महत्व दिल्यामुळे खरेतर राष्ट्रवादीच्या दोन गटातील वाद मिटला आहे.

आमच्यातील परस्परविरोधी भूमिकेचा फायदा घेत गावातील भाजपचे नेतेमंडळी स्वतःच्या पक्षाचा सरपंच करण्यासाठी सरसावली होती. परंतु त्यांचे मनसुबे आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही." 

दुसरीकडे, माळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदीप तावरे यांचा राजिनामा शनिवारी झालेल्या सदस्यांच्या बैठकीत मंजूर झाला. 

या प्रक्रियेत सरपंच जयदीप तावरे, वसंतराव तावरे, मिलींद तावरे, दिलीप तावरे, उद्योजक रणजित अशोक तावरे, लालासाहेब चव्हाण, प्रशांत मोरे, प्रविण चव्हाण इत्यादींची भूमिका निर्णायक ठरली.

 माळेगावातील एकमेकांचे कट्टर विरोधक रणजित तावरे व रविराज तावरे यांची गळाभेट विशेषतः सोशल मिडीयाद्वारे वेगाने पसरली.

` ये बंधन तो प्यार का बंधन है...जन्मोंका संगम है,` अशापद्धतीचे  चित्र वरील गळाभेटीवर अनेकांनी व्हाॅटस अॅप व फेसबुकद्वारे रंगविले, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तावरेबंधूंच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com