धमकीच्या पत्रानंतर अशोक पवारांना अजितदादांचा फोन...

शिरूर पोलिसांनी लोकप्रतिनिधीची बदनामी व धमकीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
Ajit Pawar_ashok Pawar
Ajit Pawar_ashok PawarSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : आमदार ॲड. अशोक पवार यांच्या जीविताबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेल्या व त्यांची बदनामी करणाऱ्या निनावी पत्राचे पडसाद आज (ता. १९ ऑक्टोबर) सर्व स्तरांत उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी आमदार पवारांशी संपर्क साधून विचारपूस केली; तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासह विविध पक्ष-संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविला. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत शिरूर पोलिसांनी लोकप्रतिनिधीची बदनामी व धमकीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. (Ajit Pawar calls MLA Ashok Pawar after threatening letter)

दिवंगत नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा काही वर्षांपूर्वी येथे भरदिवसा खून झाला होता. त्या घटनेचा उल्लेख करून 'आमदार अशोक पवार यांचाही एखाद्या दिवशी महेंद्र मल्लाव सारखा कार्यक्रम होणार', असा आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्र शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक व विविध पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १८ ऑक्टोबर) शिरूरकर नागरीकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून या पत्रातील भाषेचा व त्यामागील सूत्रधारांचा निषेध नोंदविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी या संदर्भात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

Ajit Pawar_ashok Pawar
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा राहणार

दरम्यान, याबाबत माहिती समजताच अजित पवार यांनी आमदार पवार यांच्याशी संपर्क साधून आस्थेने विचारपूस केली. काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. याबाबत त्वरित ॲक्शन घेण्याच्या सूचना पोलिस दलाला दिल्या असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूरमध्ये आले असताना, या घटनेची माहिती घेतली. लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे धमकाविणे निषेधार्ह असून, याबाबत गृहखात्याने गंभीर दखल घ्यावी, असे ते म्हणाले. समाजामध्ये अशा विकृत प्रवृत्ती वाढत चालल्यात हे दुर्दैवी असून, या पत्राची व त्यामागील शक्तींची चौकशी झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

Ajit Pawar_ashok Pawar
आमदार अशोक पवारांना धमकी : शिरूरमधील वातावरण तापलं; सर्वपक्षीयांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाने अधिकृत पत्रादवारे या घटनेचा निषेध नोंदविला असून, आमदार पवार व त्यांच्या कुटूंबियांना निनावी पत्रातून धमकी देणारांचा शोध तातडीने लावावा, अशी मागणी माजी आमदार बाबूराव पाचर्णे व भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केली आहे. भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकी दिली जात असेल तर सर्वसामान्य नागरीकांची काय गत होईल, अशी भीती व्यक्त केली. गेल्या काही महिन्यात कायदा-सुव्यवस्था सर्वत्र ढासळली आहे. खून, दरोडे, बलात्कार व मारामाऱ्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. चुकीचे काम करणारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, असे ते म्हणाले.

Ajit Pawar_ashok Pawar
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना ठार मारण्याची धमकी; शिरूरमध्ये खळबळ

लोकप्रतिनिधी, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांविरोधात खालच्या पातळीवर लिहिणारांची बोटे छाटू, असा इशारा मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे व मनसेचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे यांनी दिला. राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप चालू असतात पण या पत्रातील मजकूराने सामाजिक शांततेला बाधा आणण्याचा व सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा विघातक शक्तींना जशास तसे उत्तर देण्यास मनसे खंबीर असून अशा प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी प्रसंगी बोटे छाटू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष नाथा शेवाळे, जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनीही या प्रकाराबद्दल निषेध नोंदविला. विकृत प्रवृत्तींचा हा खोडसाळपणा असून, नागरीक व कार्यकर्त्यांनी या घटनेतून विचलित न होता संयम राखावा, असे आवाहन बारवकर यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com