दोन मंत्री, तीन आमदार जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीच्या रिंगणात!

पुणे जिल्हा बॅंकेसाठी अजित पवार, भरणे, दोन आमदारांसह ३१ उमेदवारी अर्ज दाखल
Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Sanajy Jagtap-Ashokpawar
Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Sanajy Jagtap-AshokpawarSarkarnama

पिंपरी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन जानेवारीला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (ता. २ डिसेंबर) २१ जणांनी ३१ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajip Pawar), शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane), खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) आणि पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप (sanjay jagtap) यांनी अगोदरच उमेदवारी दाखल केलेली आहे. (Ajit Pawar, Dattatreya Bharane and 2 MLAs along with 31 nominations filed for Pune District Bank)

पीडीसीसीच्या संचालक मंडळातील २१ जागांकरिता दोन जानेवारीला मतदान होणार आहे. तर, ता. ४ जानेवारीला मतमोजणी आहे. बॅंकेच्या २१ पैकी सर्वाधिक १३ जागा अ वर्ग मतदारसंघात आहेत. एकेक जागा ब (पणन, प्रक्रिया), क (पतसंस्था, नागरी, बॅंका), ड (उर्वरित), एससीएसटी, एनटी, ओबीसी आणि महिला यांच्यासाठी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन दोन जानेवारीला मतदान होणार आहे, त्यासाठी बुधवार (ता. १ डिसेंबर) २५ उमेदवारी अर्ज आले होते. तर, आज ते ३१ झाले आहेत, असे निवडणूक अधिकारी मिलिंद सोबळे यांनी सांगितले. सुमारे १३२ जणांनी ४३२ उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Sanajy Jagtap-Ashokpawar
जिल्हा बॅंकेसाठी अजितदादांचा अर्ज; दुसऱ्या नावाची उत्सुकता!

गेल्या चार दिवसांत आतापर्यंत ३४ जणांनी ६० अर्ज दाखल केले आहेत. पहिला अर्ज विद्यमान अध्यक्ष रमेशअप्पा थोरात यांनी दाखल केला. त्यांनीच काल ते तीन सादर केले. तर, आज आणखी तीन अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे त्यांच्या एकट्याची उमेदवारी अर्जसंख्या ही सात झाली आहे. त्यांनी ते सर्व अर्ज हे दौंड अ वर्ग मतदारसंघातून सादर केले आहेत. महिला प्रतिनिधी वैशाली नागवडे (दौंड) यांनी दोन आणि वंदना काळभोर (लोणी काळभोर, ता. हवेली), सरोजिनी मोकाशी (शिरूर), जयश्री खेडेकर यांनी आज उमेदवारी दाखल केली.

Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Sanajy Jagtap-Ashokpawar
पंचाहत्तरीतील निवृत्तिअण्णा गवारेंच्या विरोधात यंदा आमदार पवारांनी ठोकला शड्डू!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग, बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २ डिसेंबर) दाखल केले आहेत. त्यांच्याजोडीने आमदार अशोक पवार (शिरूर), सुनील चांदेरे (मुळशी), रणजित निंबाळकर (इंदापूर), रवींद्र काळे (शिरूर), भाऊसाहेब सपकळ (इंदापूर), दिलीप काळभोर, विकास दांगट, प्रकाश जगताप (तिघेही हवेली), स्वप्नील गायकवाड (शिरूर) यांनी अ वर्गातून उमेदवारी अर्ज दिले आहेत. सतीश खोमणे, रामभाऊ टुले (वि.जा./भ.ज../वि.मा.प्र.), भालचंद्र जगताप, दादासाहेब फराटे (ड वर्ग), राजेंद्र कांचन (क वर्ग) हे आज उमेदवारी दाखल केलेले इतर उमेदवार आहेत. वीरधवल जगदाळे यांनी अ, क, ड अशा तीन वर्ग मतदारसंघातून उमेदवारी आज सादर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com