अजित पवार, अतुल बेनकेंनी बिबट सफारीसाठी भल्यापहाटे केली जागेची पाहणी!

बिबट्यांच्या अनेक पिढ्या उसातच वाढल्याने ऊस हाच त्यांचा आता अधिवास झाला आहे. यामुळे जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी, अशी आग्रही मागणी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची आहे.
Ajit Pawar-Atul Benke
Ajit Pawar-Atul BenkeSarkarnama

गणेश कोरे/संतोष आटोळे

पुणे : बिबट सफारी बारामती की जुन्नर या वादावरून सुरु झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांनतर या दोन्ही ठिकाणच्या बिबट सफारीच्या (Bibat Safari) कामांना वेग घेतला आहे. बारामती आणि जुन्नर येथील प्रस्तावित सफारीच्या जागांची पाहणी अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी रविवारी (ता. १७ एप्रिल) भल्या पहाटे केली. या दोन्ही दौऱ्यात अनुक्रमे पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील आणि जुन्नर वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक अमित भिसे उपस्थित होते. (Ajit Pawar, Atul Benke inspect the site in Baramati, Junnar for Bibat Safari)

जुन्नरचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांतून २०१६ मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जुन्नरच्या आंबेगव्हाण येथे बिबट सफारीला तत्वतः मान्यता दिली होती. मात्र, हा प्रकल्प रेंगाळला होता. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथील प्रस्तावित बिबट सफारीसाठी निधीची तरतूद न करता गाडीखेल (ता. बारामती) येथील बिबट सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने जुन्नरमध्ये रोष निर्माण झाला होता. माजी आमदार शरद सोनवणे यांनी तर चार दिवस उपोषण केले. या उपोषणामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार यांनी जुन्नरलादेखील सफारी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जुन्नरमधील विविध जागांचे सर्वेक्षण वन विभाग आणि आमदार अतुल बेनके यांनी सुरू केले आहे.

Ajit Pawar-Atul Benke
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

याच सर्वेक्षणाचा भाग म्हणून रविवारी (ता. १७ एप्रिल) सकाळी आंबेगव्हाण येथील काही जागांची पाहणी आमदार बेनके यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. या वेळी सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, वनाधिकारी काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर्किटेक्ट अश्फाक अहमद उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाडीखेल (ता. बारामती) येथील प्रस्तावित बिबट सफारीच्या जागेची पाहणी केली. यावेळी पुणे वन विभागाचे उपवनसरंक्षक राहुल पाटील, यांच्यासह बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, वनपरिमंडळ अधिकारी हेमंत मोरे, अमोल पाचपुते, गाडीखेल चे सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच शरद शेंडे, वनरक्षक गोलांडे,माने आदी उपस्थित होते.

Ajit Pawar-Atul Benke
शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग : शिवचरित्र अभ्यासकाचा आरोप

जुन्नरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची बिबट सफारी व्हावी

जुन्नर तालुक्यातील धरणांच्या शृखंलेमुळे पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तीन तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र आणि साखर कारखाने गेल्या २०-२२ वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सलग ऊस शेतीमुळे पाण्याची उपलब्धता, लपण, आणि पाळीव प्राणी हे भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्याने जंगलातील बिबटे उसामध्ये स्थिरावले. परिणामी बिबट्यांच्या अनेक पिढ्या उसातच वाढल्याने ऊस हाच त्यांचा आता अधिवास झाला आहे. यामुळे जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी, अशी आग्रही मागणी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची आहे.

Ajit Pawar-Atul Benke
इंदापूरकरांनी घरी बसवलेले कोल्हापुरात भाजपच्या प्रचाराला गेले होते : भरणेंचा पाटलांना टोमणा

जुन्नर तालुक्यातील वातावरण बिबट्यांच्या अधिवासासाठी पोषक असल्याने याच ठिकाणी सफारी व्हावी आणि ती आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, यासाठी परदेशी गुंतवणुक आणता येईल का? याचा देखील विचार व्हावा. यबाबतचे संकल्पना टिपण जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पुणे भेटीदरम्यान दिले आहे. या टिपणावर चर्चा करत ठाकरे यांनी लवकरच बैठक आयोजित करुन आपणांस निमंत्रित करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. मात्र अद्याप बैठक झाली नसून, बैठकीसाठीचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com