Ajit Pawar News : 'माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चूक झाली' अजितदादांनी मागितली 'त्या' विधानावर माफी

Ajit Pawar News : एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला होता.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Ajit Pawar News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शुक्रवारी पुणे (Pune) दौऱ्यावर होते. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना पवारांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला होता. त्यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई यांच्या फुलेऐवजी सावित्रीबाई होळकर असे म्हटले. मात्र, या कार्यक्रमातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल आल्यानंतर भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला. तसेच अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

या सर्व घडामोडीनंतर शनिवारी अजित पवार यांनी आपल्या चुकीसाठी माफी मागितली. आपल्याकडून बोलण्याच्या ओघात ती चूक झाली, असं व्हायला नको होते, त्यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली.

Ajit Pawar News
Shivajirao Adhalarao Patil News : गेल्या सहा महिन्यांपासून बळ आले; २०२४ ला पुन्हा दंड थोपटणारच : आढळराव पाटील

संबंधित विधानावर दिलगीरी व्यक्त करताना पवार म्हणाले, ''कधी-कधी बोलण्याच्या ओघात माणसाकडून चूक होते. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये याचा मोठा गवगवा केला जातो. मी सावित्रीबाई फुले यांना चुकून सावित्रीबाई होळकर असे म्हणालो, यामध्ये मी असा काय मोठा गुन्हा केला. ज्यामुळे अनेकांचे आकाश पाताळ एक झाले. खरे तर, मी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे, त्यामुळे माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती, असेही ते म्हणाले. परंतु बोलण्याच्या ओघात चूक झाली, असे पवार यांनी स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकला.

Ajit Pawar News
Sanjay Raut; नारायण राणे यांनी सांगावे, तीथे यायला तयार आहे!

मी आहिल्याबाई होळकरांनाही तसेच बोललो व सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख फुले म्हणण्याऐवजी होळकर असा झाला. माझी चूक लक्षात आल्यानंतर मी दिलगीरीही व्यक्त केली. जिथे आपल्याकडून चूक होते, तिथे दिलगीरी व्यक्त करून पुढे जायचे असते, असे आपल्याला वडिलधाऱ्यांनी शिकवले. यामुळे कुणाचे काही बिघडत नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in